बिझनेस

इंधन खर्च १२ अब्ज डॉलरवर जाणार; जर रशियन तेलाची आयात भारतात थांबली तर... : SBI अहवाल

जर देशाने रशियन कच्चे तेल खरेदी करणे थांबवले तर भारताचे कच्चे तेल आयात खर्च ९ अब्ज डॉलरने वाढून १२ अब्ज डॉलरवर पोहोचू शकते, असे स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय)च्या अहवालात म्हटले आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : जर देशाने रशियन कच्चे तेल खरेदी करणे थांबवले तर भारताचे कच्चे तेल आयात खर्च ९ अब्ज डॉलरने वाढून १२ अब्ज डॉलरवर पोहोचू शकते, असे स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय)च्या अहवालात म्हटले आहे.

जर भारताने आर्थिक वर्ष २६ च्या उर्वरित काळात रशियाकडून तेल आयात थांबवली तर आर्थिक वर्ष २६ मध्ये इंधन बिल ९ अब्ज डॉलरने आणि किमती वाढल्यामुळे आर्थिक वर्ष २७ मध्ये ११.७ अब्ज डॉलरपर्यंत वाढू शकते, असे अहवालात नमूद केले आहे.

एसबीआयने म्हटले आहे की, सध्या जागतिक कच्च्या तेल पुरवठ्यात रशियाचा वाटा १० टक्के आहे. जर सर्व देशांनी रशियाकडून खरेदी करणे थांबवले तर कच्च्या तेलाच्या किमती सुमारे १० टक्क्यांनी वाढू शकतात, जर इतर कोणतेही देश त्यांचे उत्पादन वाढवत नसतील.

२०२२ पासून भारताने रशियन तेल खरेदीत लक्षणीय वाढ केली आहे, जी सवलतीच्या दराने विकली जात होती, प्रति बॅरल ६० डॉलर इतकी मर्यादित होती. पाश्चात्य राष्ट्रांनी युक्रेनवरील आक्रमणानंतर मॉस्कोवर निर्बंध लादत पुरवठा टाळला गेला.

Satara : पोलीस उपनिरीक्षकाच्या छळाला कंटाळून महिला डॉक्टरची आत्महत्या; हातावर लिहिली सुसाइड नोट

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा जोरदार पावसाचा इशारा

प्रेमभंग झाल्याने भररस्त्यात प्रेयसीवर चाकूहल्ला; प्रियकराची आत्महत्या; काळाचौकी येथील घटना

भारत बंदुकीच्या धाकावर व्यापार करार करत नाही; व्यापार मंत्री पियुष गोयल यांनी अमेरिकेला ठणकावले

आंध्रमध्ये बसला आग लागून २० प्रवाशांचा होरपळून मृत्यू