नवी दिल्ली : केंद्र सरकारने तांदूळ निर्यातीवरील बंदी हटवली आहे. कृषी उत्पादन दुप्पट करण्याचे लक्ष्य भारताने ठेवले आहे. तसेच देशाची आर्थिक प्रगती वाढवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
भारत हा जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यात करणारा देश आहे. भारताने तांदूळ निर्यातीवरील निर्बंध हटवल्याने अन्य देशांवर दबाव वाढला आहे. थायलंडच्या पांढऱ्या तांदळाचे दर घसरून प्रति टन ४०५ डॉलर झाली आहे. जानेवारी २०२४ मध्ये हाच दर ६६९ डॉलर होता.
भारताने आपले कृषी व खाद्य निर्यात वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार आहे. तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. भारताची १४० कोटी लोकसंख्या असून त्यातील ४२ टक्के जनताही शेतीवर अवलंबून आहे. भारताला तांदूळ निर्यातीत थायलंड, चीन व पाकिस्तान हे प्रतिस्पर्धी आहेत. भारताच्या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तांदळाच्या दरात घसरण झाली. त्यामुळे पाकिस्तानला फटका बसला आहे.
२०३० पर्यंत १०० अब्ज डॉलर निर्यातीचे लक्ष्य
भारताने २०३० पर्यंत कृषी व खाद्य उत्पादनांची निर्यात १०० अब्ज डॉलर निर्यातीचे लक्ष्य ठेवले आहे. व्यापार मंत्री पियूष गोयल यांच्या म्हणण्यानुसार, २०२३-२४ मध्ये भारताने ४८.१५ अब्ज डॉलरचे कृषी व खाद्यान्नाची निर्यात केली होती. भारतातून गेल्यावर्षीपासून ५० अब्ज डॉलरची निर्यात झाली आहे. जशी पोटाला भूक असते, तसेच प्रत्येक देशाच्या वाणिज्य खात्याला मोठे ध्येय गाठायचे असते. आम्ही १०० अब्ज डॉलरचा आकडा पार करू, असे गोयल म्हणाले.
भारताने २०२२ मध्ये रशिया-युक्रेन युद्धानंतर तांदळाच्या निर्यातीवर कडक धोरण स्वीकारले. कारण रशिया-युक्रेन युद्धानंतर दरवाढ झाल्याने भारताला तांदळाचे उत्पादन कमी होण्याची भीती होती. त्यामुळे आशिया व उत्तर अमेरिकेतील नागरिकांनी तांदूळ खरेदी करणे सुरू केले. त्यामुळे आशियातील तांदळाच्या किमती २००८ नंतर वाढल्या.
भारताने सप्टेंबरमध्ये तांदूळ निर्यातीवर लावलेले निर्बंध हळूहळू कमी केले. एस ॲण्ड पी ग्लोबलच्या म्हणण्यानुसार, भारताने २०२३ मध्ये १.४ कोटी टन तांदूळ निर्यात केली, तर सप्टेंबर २०२४ ते ऑक्टोबर २०२५ दरम्यान भारत २.१५ कोटी टन तांदूळ निर्यात करू शकतो.
भारतीय आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंध संशोधन परिषदेचे कृषी अर्थतज्ज्ञ अशोक गुलाटी म्हणाले की, भारताने ५.४ ते ५.५ कोटी टन जागतिक बाजारात भारताने २ कोटी टनापेक्षा तांदूळ निर्यात केल्यास बाजारात पूर येईल.
पाकिस्तानला मोठा फटका
भारत तांदळाच्या बाजारात परतल्याने पाकिस्तानला मोठे नुकसान झाले. भारत यापूर्वी बाजारातून लांब राहिल्याने इंडोनेशिया व पूर्व आफ्रिकी देशांमध्ये आपले स्थापन निर्माण केले होते. लाहोरच्या लतीफ राइस मिल्सचे निर्यात संचालक इब्राहिम शफीक म्हणाले की, भारताने तांदळावरील निर्बंध हटवल्याने पाकिस्तानातून गैर-बासमती तांदळाचे दर एका रात्रीत प्रति टन ८५० डॉलरवरून ६५० डॉलर झाले.