बिझनेस

भारत-अमेरिका व्यापार करार ९ जुलैपूर्वी होण्याची शक्यता; भारतीय पथक अमेरिकेतून परतले, व्यापार चर्चा सुरू राहणार

मुख्य वाटाघाटीकार राजेश अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील भारतीय शिष्टमंडळ अंतरिम व्यापार करारावरील चर्चेचा आणखी एक टप्पा पूर्ण करून वॉशिंग्टनहून परतले आहे. परंतु कृषी आणि वाहन क्षेत्रातील काही मुद्दे अद्याप सोडवायचे असल्याने चर्चा सुरूच राहतील, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

Swapnil S

नवी दिल्ली : मुख्य वाटाघाटीकार राजेश अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील भारतीय शिष्टमंडळ अंतरिम व्यापार करारावरील चर्चेचा आणखी एक टप्पा पूर्ण करून वॉशिंग्टनहून परतले आहे. परंतु कृषी आणि वाहन क्षेत्रातील काही मुद्दे अद्याप सोडवायचे असल्याने चर्चा सुरूच राहतील, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

अधिकाऱ्याने सांगितले की, चर्चा शेवटच्या टप्प्यात आहे आणि ९ जुलैपूर्वी त्याचा निष्कर्ष जाहीर होण्याची अपेक्षा आहे. भारतीय पथक वॉशिंग्टनहून परतले आहे. वाटाघाटी सुरूच राहतील. कृषी आणि वाहन क्षेत्रातील काही मुद्दे सोडवायचे आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले. २६ जून ते २ जुलैदरम्यान अमेरिकेसोबतच्या अंतरिम व्यापार करारावरील वाटाघाटीसाठी भारतीय पथक वॉशिंग्टनमध्ये होते.

ट्रम्पच्या परस्पर वाढीव आयात शुल्कावरील स्थगिती ९ जुलै रोजी संपत असल्याने चर्चा महत्त्वाची आहे. त्यापूर्वी दोन्ही बाजू चर्चा अंतिम करण्याचा विचार करत आहेत. अमेरिकन शेती आणि दुग्धजन्य पदार्थांना कर सवलती देण्याबाबत भारताने कडक भूमिका घेतली आहे कारण हे क्षेत्र राजकीयदृष्ट्या संवेदनशील आहेत.

२ एप्रिल रोजी अमेरिकेने भारतीय वस्तूंवर अतिरिक्त २६ टक्के परस्पर कर लादला परंतु तो ९० दिवसांसाठी स्थगित केला. तथापि, अमेरिकेने लादलेला १० टक्के ‘बेसलाइन’ कर कायम आहे.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video