KTM  KTM
बिझनेस

KTM ची Duke 200 आणि 250 आता नव्या रंगांमध्ये उपलब्ध...जाणून घ्या कोणते असतील नवे रंग

भारतीय तरुणांना भूरळ घालणारी प्रीमियम नेकेड स्ट्रीट फायटर बाईक KTM 200 Duke आणखी आकर्षक बनली आहे.

Suraj Sakunde

मुंबई: भारतीय तरुणांना भूरळ घालणारी प्रीमियम नेकेड स्ट्रीट फायटर बाईक KTM 200 Duke आणखी आकर्षक बनली आहे. KTM 200 Duke आता नव्या रंगांमध्ये मिळत आहे. पूर्वीच्या इलेक्ट्रॉनिक ऑरेंज आणि डार्क ग्रे मॅटबरोबरच आता आणखी दोन नवीन रंग उपलब्ध असणार आहेत.

दोन नवीन रंगात मिळणार KTM 200-

हे नवीन रंग इलेक्ट्रॉनिक ऑरेंज आणि डार्क गॅल्व्हानो आहेत. त्यावर KTM ब्रँडिंग देखील आहे. KTM 200 Duke चा सिल्व्हर मेटॅलिक कलर पूर्वीप्रमाणेच उपलब्ध राहील.

रेडी टू रेस-

KTM चे "रेडी टू रेस" स्लोगन देखील नवीन चमकदार रंगांमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. या बाइकमध्ये संपूर्ण एलसीडी स्क्रीन आहे. रात्रीच्या वेळी मार्ग स्पष्टपणे दिसण्यासाठी एलईडी लाईट्स देण्यात आल्या आहेत.

बेस्ट-इन-क्लास डब्ल्यूपी यूएसडी फोर्क-

या बाईकमध्ये ABS प्रणाली चालू किंवा बंद केली जाऊ शकते. यासह बेस्ट-इन-क्लास डब्ल्यूपी यूएसडी फोर्क, मोनो-शॉक रिअर सस्पेन्शन आणि ॲल्युमिनियम स्विंगआर्मसह हलके वेट ट्रेलीस फ्रेम आहे.

31 PS ची जबरदस्स्पीत पॉवर-

ड प्रेमींसाठी डिझाइन केलेली 250 Duke मध्ये शक्तिशाली 250cc इंजिन आहे. हे इंजिन 31 PS ची शक्ती देते. बाईकची मजबूत चेसिस (ट्रेलीस फ्रेम), डब्ल्यूपी सस्पेन्शन, एलईडी लाईट्स, ऑन-ऑफ वैशिष्ट्यांसह एबीएस, क्विकशिफ्टर+ आणि मजबूत स्टाइल आहे, ज्यामुळे ती आणखी जबरदस्त बनते.

Maharastra Rain: मुसळधार पावसाची शक्यता; ऑरेंज अलर्ट जारी

शाहरुख खान लेकामुळे पुन्हा अडचणीत! समीर वानखेडेंची न्यायालयात धाव, २ कोटींचा मानहानीचा दावा

लडाख आंदोलनाला हिंसक वळण; भाजपचा कॉँग्रेसवर कटाचा आरोप

पुन्हा उभं राहण्याची आशा संपली! धाराशिवमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या; अतिवृष्टीने शेत गेलं वाहून

मुंब्रा-कळवा भागात पाणीटंचाई; पाणीटंचाईबाबत महापालिका मुख्यालयावर धडक; जितेंद्र आव्हाडांनी अधिकाऱ्यांना विचारला जाब