महिंद्रा स्कॉर्पिओ एन insta: @rahul_raosaheb
बिझनेस

Mahindra Scorpio N पुढं ट्रॅक्टरही फेल! ड्रायव्हशिवाय केली शेताची मशागत, पाहा Viral Video

Mahindra Scorpio Nचा नादच खुळा! पाहा ड्रायव्हरशिवाय कसं नांगरलं शेत?

Suraj Sakunde

मुंबई: बैलांच्या साहाय्यानं किंवा ट्रॅक्टरच्या साहाय्यानं शेतीची कामं केल्याचं तुम्ही पाहिलं असेल. पण शेतीची काम करण्यासाठी कुणी कारचा वापर केल्याचं कधी पाहिलंय का? सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये चक्क स्कॉर्पिओ एनच्या माध्यमातून शेताची मशागत केल्याचं दिसत आहे. विशेष म्हणजे ही मशागत सुरु असताना ड्रायव्हर सीटवर कुणीच नसल्याचं दिसत आहे.

स्कॉर्पिओ एनसारखी एसयूव्ही घेणं हे अनेकांचं स्वप्न असतं. ज्यांनी अशी एखादी कार घेतलीये, ते पोटच्या पोराप्रमाणे तिला जपतात. तिला कोणताही स्क्रॅच होऊ नये याची काळजी घेतात. खराब रस्त्यावर कार नेण्यापूर्वी लोक अनेकदा विचार करतात..पण व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये शेताची मशागत करण्यासाठी एक नव्हे तर दोन यंत्र लावल्याचं दिसतंय. हा व्हिडिओ पाहून आश्चर्य वाटलं नाही तरच नवलं...

बरं, एवढंच नाही, तर गाडी ड्रायव्हरशिवाय धावत असल्याचंही तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. या अनोख्या स्टाइलमुळे स्कॉर्पिओ-एनचा हा अनोखा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ rahul_raosaheb नावाच्या व्यक्तीने त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यात पांढरी महिंद्रा स्कॉर्पिओ-N शेतात चालवली जात असल्याचे दाखवले आहे. व्हिडिओमध्ये स्कॉर्पिओ ट्रॅक्टरच्या जागी शेतात मशागत करताना दाखवण्यात आले आहे. स्कॉर्पिओ-एनच्या आत कोणीही दिसत नाही आणि तिचे दरवाजेही उघडे दिसत आहेत. शेअर केलेल्या व्हिडिओसोबत एक कॅप्शनही लिहिलं आहे. युजर लिहितो "महिंद्रा स्कॉर्पिओ-एन ट्रॅक्टरलाही फेल करत आहे.".

महिंद्रा स्कॉर्पिओ-एन एक दमदार एसयूव्ही म्हणून ओळखली जाते, मात्र हा व्हिडिओ पाहिल्यानंतर असं दिसतंय की आता हे कृषी क्षेत्रातही ती उपयुक्त वाहन ठरू शकते. तुम्हाला काय वाटतंय?

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत