बिझनेस

किरकोळ महागाईचा सहा वर्षांचा नीचांक

भाजीपाला आणि प्रथिनेयुक्त पदार्थांच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे मार्चमध्ये किरकोळ महागाई ३.३४ टक्क्यांच्या जवळपास सहा वर्षांच्या नीचांकी पातळीवर आली.

Swapnil S

नवी दिल्ली : भाजीपाला आणि प्रथिनेयुक्त पदार्थांच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे मार्चमध्ये किरकोळ महागाई ३.३४ टक्क्यांच्या जवळपास सहा वर्षांच्या नीचांकी पातळीवर आली.

ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय) आधारित किरकोळ महागाई दर फेब्रुवारीमध्ये ३.६१ टक्के आणि गेल्या वर्षी मार्चमध्ये ४.८५ टक्के होती.

मार्च २०२५ मधील महागाई दर ऑगस्ट २०१९ नंतर सर्वात कमी आहे, जेव्हा तो ३.२८ टक्के होता. अन्नधान्य चलनवाढीचा दर फेब्रुवारीमधील ३.७५ टक्के आणि मार्च २०२४ मध्ये ८.५२ टक्क्यांच्या तुलनेत मार्चमध्ये २.६९ टक्के होता.

गेल्या आठवड्यात, रिझर्व्ह बँकेने महागाई कमी करण्याच्या पार्श्वभूमीवर मुख्य अल्प-मुदतीच्या कर्ज दरात (रेपो) २५ आधार अंकांनी कपात केली. रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी सीपीआय महागाई दर ४ टक्के, पहिली तिमाही ३.६ टक्के, दुसरी तिमाही ३.९ टक्के, तिसरी तिमाही ३.८ टक्के आणि चौथ्या तिमाहीमध्ये ४.४ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. जोखीम समान रीतीने संतुलित आहेत.

डब्ल्यूपीआय आकडेवारीनुसार, अन्नधान्य महागाई फेब्रुवारीमधील ३.३८ टक्क्यांवरून मार्चमध्ये १.५७ टक्क्यांवर कमी झाली. दरम्यान, भाजीपाला, बटाटे आणि इतर खाद्यपदार्थांच्या किमती कमी झाल्यामुळे घाऊक महागाईचा दर मार्चमध्ये घसरला. फेब्रुवारीमध्ये ५.८० टक्क्यांच्या तुलनेत या महिन्यात भाज्यांची चलनवाढ १५.८८ टक्के होती.

फेब्रुवारीमध्ये २.८६ टक्क्यांच्या तुलनेत मार्चमध्ये उत्पादित उत्पादनांची महागाई ३.०७ टक्क्यांनी वाढली. इंधन आणि ऊर्जेतही मार्चमध्ये महागाईचा दर ०.२० टक्क्यांनी वाढला होता, तर फेब्रुवारीमध्ये ०.७१ टक्क्यांनी चलनवाढ झाली होती.

घाऊक महागाई चार महिन्यांच्या नीचांकी पातळीवर

घाऊक महागाईचा दर मार्चमध्ये २.०५ टक्क्यांवर घसरला असून फेब्रुवारीमध्ये तो २.३८ टक्क्यांवर होता, अशी सरकारी आकडेवारी मंगळवारी जाही झाली. घाऊक महागाई आता चार महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आली आहे. घाऊक किंमत निर्देशांक (WPI) आधारित महागाई दर वार्षिक आधारावर मात्र वाढला. मार्च २०२४ मध्ये तो ०.२६ टक्के होता. मार्च, २०२५ मध्ये चलनवाढीचा सकारात्मक दर प्रामुख्याने अन्न उत्पादने, इतर उत्पादन, खाद्यपदार्थ, वीज आणि कापड उत्पादन इत्यादींच्या किमतींमध्ये वाढ झाल्यामुळे आहे, उद्योग मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.

राज्याच्या EV धोरणाला अपवाद! बॉम्बे उच्च न्यायालयातील ६३ न्यायमूर्तींसाठी नवीन पेट्रोल-डिझेल गाड्यांना परवानगी

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

शाडू मातीच्या मूर्ती आता होणार ‘ऑनलाइन’ उपलब्ध; पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी BMC चे विशेष प्रयत्न

गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जेट्टीला परवानगी; परिसरात सुविधा पुरवताना खबरदारी घेण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश