बिझनेस

पुण्यातील घरांची सरासरी किंमत ११ टक्क्यांनी वाढून उच्चांकावर; २०२४ मध्ये सरासरी विक्री ५ टक्क्यांनी घसरली : रिपोर्ट

पुण्यातील निवासी मालमत्तांचे सरासरी दर २०२४ मध्ये वार्षिक आधारावर ११ टक्क्यांनी वाढून ६,५९० रुपये प्रति चौरस फूट या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचले, असे गेरा डेव्हलपमेंट्सच्या अहवालात म्हटले आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : पुण्यातील निवासी मालमत्तांचे सरासरी दर २०२४ मध्ये वार्षिक आधारावर ११ टक्क्यांनी वाढून ६,५९० रुपये प्रति चौरस फूट या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचले, असे गेरा डेव्हलपमेंट्सच्या अहवालात म्हटले आहे.

पुण्याच्या निवासी क्षेत्रावरील द्वि-वार्षिक अहवालात, रिअल इस्टेट कंपनी गेरा डेव्हलपमेंट्स प्रायव्हेट लिमिटेडने निदर्शनास आणले की, २०२४ कॅलेंडर वर्षात विक्री ५ टक्क्यांनी घसरून ९०,१२७ युनिट्सवर आली.

घरांच्या किमतीतील वाढ सलग ५ व्या वर्षी सुरूच राहिली. आधीच वाढलेल्या आधारावर, संपूर्ण शहरात सरासरी दर १०.९८ टक्क्यांनी वाढून ६,५९० रुपये प्रति चौरस फूट इतका सर्वकालीन उच्चांकावर गेला, असे अहवालात म्हटले आहे.

२०२२ मधील १.०३ लाख घरांची विक्री २०२३ मध्ये सुमारे ९४,५०० घरांवर आणि २०२४ मध्ये जवळपास ९० हजार घरांपर्यंत खाली आली आहे, असे अहवालात म्हटले आहे.

नवीन लाँच देखील २०२४ मध्ये ९१,४०० युनिट्सवर आले आहेत जे मागील वर्षातील ९६,३५० युनिट होते. तर २०२२ मध्ये १.०३ लाख नवीन घरे निर्माण झाली होती.

पुण्याच्या रिअल इस्टेट मार्केट २०२० मध्ये सुरू झालेली दरवाढ पाहता गेल्या पाच वर्षांमध्ये किमती सतत ४० टक्क्यांनी वाढल्या आहेत. हे क्षेत्र मजबूत असताना, २०२३ आणि २०२४ मधील विक्रीतील घट ही सावध आशावाद असल्याचे दर्शवते, असे गेरा डेव्हलपमेंट्सचे व्यवस्थापकीय संचालक रोहित गेरा म्हणाले.

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

मद्य परवान्यावरून सरकारचा सावध पवित्रा; विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय परवाने वाटप नाहीच -अजित पवार

अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज पृथ्वीकडे परतणार

जनसुरक्षा कायदा ‘अर्बन नक्सल’विरोधात उपयुक्त ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘फिल्डिंग’; काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार रस्सीखेच, 'ही' नावे चर्चेत