संग्रहित छायाचित्र 
बिझनेस

निफ्टीचा उच्चांक : सेन्सेक्सची विक्रमी ८० हजारांहून घसरण

Sagar Sirsat

मुंबई : नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (एनएसई)ने शुक्रवारी सलग तिसऱ्या सत्रात सार्वकालिक उच्चांक गाठला, तर बीएसई सेन्सेक्सची शुक्रवारच्या व्यवहारात गुरुवारी ८० हजारांच्या विक्रमी पातळीवरून घसरण झाली. सध्याच्या निर्देशांकाच्या पातळीवर गुंतवणूकदार खरेदीस तयार नसल्याचे दिसून आले. दरम्यान, भारतीय चलन बाजारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया १ पैशाने वधारून ८३.४९ वर बंद झाला.

अस्थिर सत्रात एनएसई निफ्टीत तेजी राहिली आणि २१.७०अंकांनी किंवा ०.०९ टक्क्यानी वाढून २४,३२३.८५ या नव्या उच्चांकावर बंद झाला. निवडक समभागांच्या खरेदीमुळे निफ्टी विक्रमी पातळीवर झेपावण्यास मदत झाली. निफ्टीतील तब्बल ३४ शेअर्स वाढले आणि १६ घसरले. तर बीएसई सेन्सेक्स ५३.०७ अंकांनी किंवा ०.०७ टक्क्यांनी घसरून ७९,९९६.६० वर बंद होत बाजारातील अनिश्चिततेचे संकेत दिले.

बीएसईतील एकूण २,२४२ समभाग वाढले, तर १,६८६ घसरले आणि ८८ मध्ये बदल झाला नाही. साप्ताहिक आधारावर, बीएसई सेन्सेक्स ९६३.८७ अंकांनी किंवा १.२१ टक्क्यांनी वाढला आणि निफ्टी ३१३.२५ अंकांनी वधारला. निफ्टीने दिवसभर नकारात्मक क्षेत्रात व्यवहार केले होते. तथापि, सत्राच्या शेवटच्या अर्ध्या तासात सकारात्मक व्यवहार होऊन निर्देशांक किरकोळ वाढीसह बंद झाले असले तरी निफ्टीने नवा उच्चांक नोंदवला, असे मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लि. ​​रिटेल रिसर्च प्रमुख सिद्धार्थ खेमका म्हणाले.

३० शेअर्सच्या सेन्सेक्सवर्गवारीमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, रिलायन्स इंडस्ट्रीज, हिंदुस्तान युनिलिव्हर, एनटीपीसी, लार्सन अँड टुब्रो, नेस्ले इंडिया, पॉवर ग्रिड, आयटीसी, जेएसडब्ल्यू स्टील आणि सन फार्मास्युटिकल्स यांचे समभाग वधारले. दुसरीकडे, एचडीएफसी बँक, टायटन, महिंद्रा अँड महिंद्रा, इंडसइंड बँक, अल्ट्राटेक सिमेंट, टाटा मोटर्स, एचसीएल टेक्नॉलॉजीज आणि एशियन पेंट्स यांच्या समभागात घसरण झाली.

बीएसई स्मॉलकॅप ०.७० टक्क्यांनी वधारला आणि मिडकॅप निर्देशांक ०.७५ टक्क्यांनी वाढला. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये तेल आणि वायू १.७७ टक्के, ऊर्जा १.७० टक्के, भांडवली वस्तू १.५५ टक्के, औद्योगिक १.४८ टक्के आणि ऊर्जा १.२४ टक्के वाढले. याउलट, वित्तीय सेवा ०.५९ टक्के, ग्राहकोपयोगी वस्तू ०.४३ टक्के, बँक ०.१८ टक्के, आयटी ०.१३ टक्के आणि तंत्रज्ञान ०.०६ टक्के घसरले.

रिलायन्सचे बाजारमूल्य २१,५१,५६२ कोटींवर

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागांनी जवळपास ३ टक्क्यांनी झेप घेतली आणि प्रत्येकी ३,१९७.६५ रुपयांच्या ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला. सर्वाधिक बाजारमूल्य असलेल्या रिलायन्सचे बाजारमूल्य तब्बल ४८,७२३.५४ कोटी रुपयांनी वाढून २१,५१,५६२.५६ कोटी रुपयांवर पोहोचला. तसेच, टेक्सटाईल कंपनीने रिअल इस्टेट व्यवसायाला डिमर्जिंग केल्याचे सांगितल्यानंतर रेमंडच्या समभागामध्ये ९ टक्क्यांहून अधिक वाढ झाली.

जागतिक तेल बाजारातील ब्रेंट क्रूड ०.०९ टक्क्यानी घसरून ८७.३५ अमेरिकन डॉलर प्रति बॅरलवर आले. विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी गुरुवारी भांडवली बाजारात २,५७५.८५ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. गुरुवारी बीएसई सेन्सेक्स ६२.८७ अंकांनी वाढून ८०,०४९.६७ या आतापर्यंतच्या उच्चांकावर, तर निफ्टी १५.६५ अंकांनी वाढून विक्रमी २४,३०२.१५ वर बंद झाला होता.

Mumbai : आर्थिक कोंडी फोडण्यासाठी ‘बेस्ट’ आयडिया! आता CNG विकणार; २७ डेपोंत प्रकल्प राबवणार

कोल्हापूर -पुणे 'वंदे भारत' आजपासून; आठवड्यातून ३ दिवस धावणार, बघा वेळापत्रक

‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी भेदभाव; दोन वकिलांची मुंबई पोलिसांकडे तक्रार

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवठ्यात निवडणुका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संकेत, महायुतीचे जागावाटप आठवडाभरात पूर्ण!

गणरायाच्या विसर्जन सोहळ्यासाठी BMC सज्ज; ६९ नैसर्गिक स्थळांसह, २०४ कृत्रिम विसर्जनस्थळांची व्यवस्था