बँकॉक : एनव्हीडियाचे सीईओ जेन्सेन हुआंग यांनी शुक्रवारी सांगितले की, कंपनी ट्रम्प प्रशासनासोबत चीनसाठी डिझाइन केलेल्या संभाव्य नवीन संगणक चिपवर चर्चा करत आहे.
हुआंग यांना तैवानच्या भेटीवर असताना चीनसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता डेटा सेंटरसाठी संभाव्य ‘B30A’ सेमीकंडक्टरबद्दल विचारले गेले असता त्यांनी वरील माहिती दिली. तेथे ते एनव्हीडियाच्या प्रमुख उत्पादन भागीदार, जगातील सर्वात मोठ्या चिप उत्पादक तैवान सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पला भेटीसाठी गेले होते.
मी चीनला- एआय डेटा सेंटरसाठी एक नवीन उत्पादन ऑफर करत आहे, H20 चा पुढील टप्पा, असे हुआंग म्हणाले. परंतु ते पुढे म्हणाले, हा आमचा निर्णय नाही. अर्थातच, हे युनायटेड स्टेट्स सरकारवर अवलंबून आहे आणि आम्ही त्यांच्याशी संवाद साधत आहोत, परंतु त्यासंदर्भात आताच बोलणे खूप लवकर होईल. अशा चिप्स ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट्स किंवा जीपीयू आहेत, जे विविध प्रकारच्या एआय सिस्टम तयार करण्यासाठी आणि अपडेट करण्यासाठी वापरले जाणारे उपकरण आहे.