बिझनेस

अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय मिळालं? देवेंद्र फडणवीसांनी यादीच वाचली

Suraj Sakunde

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत मोदी ३.० सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी तसेच खासदारांनी जोरदार टीका केली. बिहार तसेच आंध्रप्रदेश या राज्यांना मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला आहे. बिहारला सुमारे ५८ हजार कोटी तसेच आंध्रप्रदेशला १५ हजार कोटी रुपयांचं विशेष पॅकेज जाहीर करण्यात आलं आहे. मात्र देशाच्या तिजोरीत सर्वाधिक सर्वाधिक धन जमा करणाऱ्या महाराष्ट्राला भाजपनं परंपरेनुसार भोपळा दिला, अशी टीका विरोधी पक्षातील काही नेत्यांनी केली होती. यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून महाराष्ट्राला अर्थसंकल्पातून काय काय मिळालं, हे त्यांनी सांगितलं आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आमच्या महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी आणि खासदारांनी बजेट न वाचता घोषणा दिल्या. बजेट न वाचता प्रतिक्रिया दिल्या. मला असं वाटतं, जनता जेव्हा तुम्हाला निवडून देते, तेव्हा एवढीच अपेक्षा असते की काय तरतूदी आहेत, त्या वाचल्या पाहिजेत. मी पाहिलं तर मला महाराष्ट्रातील तरतूदी सापडल्या. "

अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय मिळालं?

  • विदर्भ मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प- ६०० कोटी

  • महाराष्ट्र ग्रामीण रस्ते सुधार- ४०० कोटी

  • सर्वसमावेशक विकासासाठी इकॉनॉमिक कॉरिडॉर-४६६ कोटी

  • पर्यावरणपूरक शाश्वत कृषि प्रकल्प-५९८ कोटी

  • महाराष्ट्र कृषी आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प-१५० कोटी

  • एयूपीटी-३ - ९०८ कोटी

  • मुंबई मेट्रो-१०८७ कोटी

  • दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर-४९९ कोटी

  • एमएमआर ग्रीन अर्बन मोबिलिटी-१५० कोटी

  • नागपूर मेट्रो-६८३ कोटी

  • नाग नदी पुनरुज्जीवन ५०० कोटी

  • पुणे मेट्रो ८१४ कोटी

  • मुळा मुठा नदी संवर्धन-६९० कोटी

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, मला वाटतं विनाकारण नॅरेटीव्ह सेट करण्याचा जो प्रयत्न होतो, की महाराष्ट्राला काही मिळालं नाही, ते तुमच्या समोर नाही. रेल्वेच्या बजेटचे पैसे तर अजून सांगितले नाहीत. वेगवेगळ्या योजना महाराष्ट्राला मिळाल्या आहेत, त्याच्या फाईल प्रिंट माझ्याकडे अजून यायच्या आहेत. माझा विरोधकांना सल्ला आहे, नरेटिव्ह सेट करण्यासाठी राजकारण करू नका. आपल्या राज्याला काही मिळावं अशी भावना असेल, तर त्याचा पाठपुरावा करा. मी दाव्यानं सांगतो, माननीय मोदी साहेबांच्या अजेंड्यावर महाराष्ट्र प्राथमिकतेने आहे. त्यामुळं महाराष्ट्राला भरपूर पैसा मिळणार आहे."

बजेट देशाचं की आंध्र-बिहारचं?

पंतप्रधान मोदी यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. भाजपला स्पष्ट बहुमत नसताना आंध्रप्रदेशातील चंद्राबाबू तेलगु देसम पार्टी तसेच बिहारमधील नितीशकुमार यांची जनता दल युनायटेड यांच्या पाठिंब्यामुळं मोदी तिसऱ्यांदा सरकार बनवू शकले. त्यामुळं या दोन राज्यांवर या अर्थसंकल्पात मोठ्या प्रमाणात तरतूद करण्यात आली आहे. बिहारला तब्बल ५८ हजार कोटी तसेच आंध्रप्रदेशला १५ हजार कोटी रुपयांचं विशेष पॅकेज जाहीर करण्यात आलं आहे. याशिवाय देशभरात लागू होणाऱ्या इतर योजनांचा लाभही या राज्यांना मिळणार आहे. त्यामुळं हे बजेट नेमकं देशाचं आहे की, बिहार-आंध्रप्रदेशचं आहे, असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या प्राथमिक माहितीनुसार महाराष्ट्राला विविध योजनांसाठी केंद्राकडून महाराष्ट्राला ७५०० कोटी रुपयांचा निधी मिळाल्याचं पत्रकार परिषदेत सांगितलं. यामध्ये आणखी वाढ होऊ शकते, असं म्हटलं आहे. परंतु विरोधी पक्षांनी मात्र देशाला सर्वाधिक धन देणाऱ्या महाराष्ट्रासाठी कोणतीही विशेष तरतूद नसल्याचं म्हणत भाजप सरकारवर टीकास्र सोडलं आहे.

मविआचा तिढा सुटला! २६० जागांवर सहमती; २८ जागांवर रस्सीखेच; १-२ दिवसांत जागावाटप जाहीर होणार

पोलिसांवर हायकोर्ट संतापले; अतिरिक्त पोलीस आयुक्तांना हजर राहण्याचे आदेश

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; तिकीट आरक्षणाच्या नियमात बदल; १ नोव्हेंबरपासून होणार लागू

Maharastra Assembly Elections 2024: पक्षांतर्गत बंडाळीच्या धोक्यामुळे महायुती, मविआकडून सावध पवित्रा

नागरिकत्व कायद्यातील अनुच्छेद '६ए' वैध; सर्वोच्च न्यायालयाचा बहुमताने निर्वाळा