संग्रहित छायाचित्र 
बिझनेस

रिझर्व्ह बँकेचा सरकारला २.६९ लाख कोटींचा लाभांश

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केंद्र सरकारसाठी आपला खजाना उघडला आहे. आरबीआयने २०२४-२५ साठी केंद्र सरकारला २.६९ लाख कोटी रुपयांचा लाभांश जाहीर केला आहे. हा लाभांश २०२३-२४ मध्ये दिलेल्या २.१ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केंद्र सरकारसाठी आपला खजाना उघडला आहे. आरबीआयने २०२४-२५ साठी केंद्र सरकारला २.६९ लाख कोटी रुपयांचा लाभांश जाहीर केला आहे. हा लाभांश २०२३-२४ मध्ये दिलेल्या २.१ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.

आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या नेतृत्वाखालील बँकेच्या संचालक मंडळाच्या ६१६ व्या बैठकीत सरकारला लाभांश देण्याचा निर्णय घेण्यात आला. जागतिक व स्थानिक आर्थिक परिस्थितीचा बँकेने आढावा घेतला. तसेच बँकेच्या वार्षिक वित्तीय अहवालाला मान्यता देण्यात आली.

आरबीआयच्या संचालक मंडळाने सुधारित आर्थिक भांडवल आराखड्यानुसार सरकारला लाभांश दिला आहे. संचालक मंडळाने २,६८,५९०.०७ लाख कोटी रुपये रक्कम लाभांश म्हणून सरकारला देण्याचे ठरवले आहे.

आरबीआयचे माजी गव्हर्नर बिमल जालान यांच्या नेतृत्वाखालील तज्ज्ञांच्या समितीच्या अहवालानुसार आरबीआय सरकारला लाभांश देते. जालान समितीने आरबीआयच्या ताळेबंदातील ५.५ ते ६.५ टक्के रक्कम आपत्कालीन जोखमीसाठी ठेवण्याची सूचना केली होती.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत