‘सेबी’च्या प्रमुख माधबी पुरी-बूच संग्रहित छायाचित्र
बिझनेस

सेबी प्रमुख माधबी पुरी-बूच यांना सरकारची 'क्लीनचिट'; कार्यकाळ पूर्ण करणार

सेबी’च्या प्रमुख माधबी पुरी-बूच यांना त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत सरकारने ‘क्लीनचिट’ दिली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : ‘सेबी’च्या प्रमुख माधबी पुरी-बूच यांना त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत सरकारने ‘क्लीनचिट’ दिली आहे. बूच यांच्यावर केलेल्या आरोपांमध्ये चौकशी समितीला कोणतेही तथ्य आढळले नाही. त्यामुळे फेब्रुवारी २०२५ पर्यंत त्या आपल्या पदावर निर्धोकपणे काम करू शकतात.

अमेरिकी शॉर्ट-सेलर हिंडेनबर्ग रिसर्च आणि काँग्रेसने सेबी प्रमुख बूच यांच्याविरोधात हितसंबंधाला बाधा येणारे वर्तन केल्याचे आरोप केले होते. हिंडेनबर्गने आरोप केले की, सेबी प्रमुख बूच व त्यांचे पती धवल बूच यांनी बर्म्युडा व मॉरिशस येथे संदिग्ध परकीय कंपन्यांमध्ये अघोषित गुंतवणूक केली आहे. त्याची माहिती त्यांनी घोषित केली नाही.

माधबी पुरी-बूच यांच्यावरील आरोपांचा मुद्दा संसदेच्या अधिवेशनात बराच गाजला होता. सेबी प्रमुख बूच यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला आहे, असा आरोप काँग्रेसने केला होता. मात्र त्याबाबत कोणतेही पुरावे मिळाले नाहीत, असे सरकारने सांगितले.

देशात सर्वात कोरडा मान्सून; एल-निनोचा फटका; सरासरीपेक्षा १५ टक्के कमी पाऊस

Mumbai : फेरीवाल्यांवरील कारवाईत समन्वयाचा अभाव; विधी समितीत हरकतीचा मुद्दा

Mumbai : खारमधील पुनर्विकासाला मंजुरी; रामकृष्णनगरच्या रहिवाशांना मिळणार मोठी घरे

Mumbai : चॉकलेटपासून साकारला नक्षीदार बाप्पा; ४ फूट उंच, तर ७५ किलो वजनाची मूर्ती

उद्घाटनापूर्वीच श्रेयाची 'लढाई'; जिजाऊ प्रवेशद्वारावर पालकमंत्र्यांचे नाव; मराठा समाजासह विविध संघटनांचा विरोध, नाव हटविण्याची मागणी