बिझनेस

यंदा डिसेंबरपर्यंत सेन्सेक्स १८ टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा; HMPV विषाणूने बाजाराला धक्का दिल्यानंतर मॉर्गन स्टॅन्लेचा दिलासादायक अहवाल

एचएमपीव्ही विषाणूमुळे देशांतर्गत शेअर बाजारात निर्देशांक घसरत आहेत. मात्र, अमेरिकन इन्व्हेस्टमेंट बँक आणि वित्तीय सेवा कंपनी मॉर्गन स्टॅन्लेने दिलेल्या वृत्तामुळे गुंतवणूकदारांना दिलासा मिळू शकतो.

Swapnil S

मुंबई : एचएमपीव्ही विषाणूमुळे देशांतर्गत शेअर बाजारात निर्देशांक घसरत आहेत. मात्र, अमेरिकन इन्व्हेस्टमेंट बँक आणि वित्तीय सेवा कंपनी मॉर्गन स्टॅन्लेने दिलेल्या वृत्तामुळे गुंतवणूकदारांना दिलासा मिळू शकतो. मॉर्गन स्टॅन्लेच्या अहवालानुसार, डिसेंबर २०२५ पर्यंत बीएसई सेन्सेक्स १८ टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे.

मॉर्गन स्टॅन्लेचा अहवाल भारताच्या इक्विटी मार्केटसाठी सकारात्मक दृष्टीकोन दर्शवितो. अहवालानुसार, मजबूत समष्टि आर्थिक स्थिरता, वित्तीय एकत्रीकरण आणि खाजगी गुंतवणुकीत वाढ यामुळे बाजाराला चालना मिळेल. “सामान्य परिस्थितीतही, आम्ही डिसेंबर २०२५ पर्यंत बीएसई सेन्सेक्स १८ टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा करतो,” असे अहवालात म्हटले आहे.

“आम्ही भारताला वित्तीय एकत्रीकरण, वाढलेली खाजगी गुंतवणूक आणि वास्तविक वाढ आणि वास्तविक व्याजदर यांच्यातील सकारात्मक फरकाचा फायदा मिळवण्याची अपेक्षा करतो. तसेच सातत्य कायम राहण्याची आशावाद आहे.

मॉर्गन स्टॅन्ले यांच्या मते, अमेरिकेत मंदी नाही, कच्च्या तेलाच्या किमती स्थिर आहेत. त्यामुळे स्थिर जागतिक आर्थिक वातावरण निर्माण होईल. मध्यवर्ती बँकेने व्याजदर कमी करून सकारात्मक तरलता स्थिती राखली पाहिजे. अहवालानुसार, आर्थिक वर्ष २०२७ पर्यंत सेन्सेक्सची १७.३ टक्के वार्षिक दराने वाढण्याची अपेक्षा आहे. मॉर्गन स्टॅनलीचे अंदाज याच कालावधीसाठी सहमतीच्या अंदाजापेक्षा १५ टक्क्यांपेक्षा जास्त आहेत. हे भारताच्या आर्थिक लवचिकता आणि कॉर्पोरेट कामगिरीबद्दल आशावाद दर्शवते.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत