बिझनेस

अमेरिका-चीन व्यापार युद्धामुळे भारतीय निर्यातदारांना फायदा होण्याची शक्यता; सूत्रांची माहिती

अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारयुद्धाचा फायदा भारतीय निर्यातदारांना अमेरिकन बाजारपेठेतील निर्यात वाढवण्यासाठी होईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारयुद्धाचा फायदा भारतीय निर्यातदारांना अमेरिकन बाजारपेठेतील निर्यात वाढवण्यासाठी होईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात जेव्हा अमेरिकेने चिनी वस्तूंवर जास्त शुल्क लादले तेव्हा देश चौथ्या क्रमांकाचा फायदा घेणारा देश असल्याचे ते म्हणाले.

पुन्हा सत्तेत आल्यानंतर, ट्रम्प यांनी शनिवारी चीनमधून आयातीवर कठोर टॅरिफ लादण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली. त्यांनी निवडणूक काळातील आश्वासन पूर्ण केले. परंतु अमेरिकन ग्राहकांसाठी वस्तूंच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे या व्यापार युद्धातून भारताला फायदा होण्याची शक्यता आहे. भारताकडून निर्यातीत लक्षणीय वाढ अपेक्षित आहे, असे एका सूत्राने सांगितले.

निर्यातदारांनी असेही म्हटले आहे की, चीनमधून आयातीवर अमेरिकेने सीमा शुल्क लादल्याने भारताला अमेरिकेला निर्यातीच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. टॅरिफचा चीनमधून अमेरिकेला होणाऱ्या निर्यातीवर परिणाम होईल कारण ते त्यांच्या वस्तूंच्या किमती अमेरिकन बाजारपेठेत वाढवतील, ज्यामुळे ते कमी स्पर्धात्मक बनतील.

फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशनचे (एफआयईओ) महासंचालक अजय सहाय म्हणाले, अमेरिकेच्या चीनमधील वस्तूंवर जादा आयात शुल्क लादण्याच्या निर्णयामुळे भारतीय निर्यातदारांसाठी संधी निर्माण होऊ शकतात. कारण यूएस खरेदीदार जास्त खर्च टाळण्यासाठी पर्यायी पुरवठादार शोधतील.

सहाय पुढे म्हणाले, फायद्यांची व्याप्ती भारताच्या उत्पादन क्षमता आणि स्पर्धात्मकतेवर अवलंबून आहे. इलेक्ट्रिकल मशिनरी आणि घटक, वाहन घटक, मोबाईल, फार्मा, रसायने, कपडे, फॅब्रिक्स या क्षेत्रांमध्ये फायदा होण्याची शक्यता आहे. एप्रिल-नोव्हेंबर २०२४-२५ दरम्यान, ८२.५२ अब्ज अमेरिकन डॉलर वस्तूंच्या द्विपक्षीय व्यापारासह (५२.८९ अब्ज डॉलर निर्यात, २९.६३ अब्ज डॉलर आयात आणि २३.२६ अब्ज डॉलर व्यापार तूट) अमेरिका भारताचा दुसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार होता. २०२१-२४ मध्ये अमेरिका भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार होता.

Mumbai : एचपीव्ही लसीकरणामुळे गर्भाशय कर्करोगावर नियंत्रण; केईएम रुग्णालयात २८२ लाभार्थ्यांना एचपीव्हीची मात्रा

NEET UG 2026 Re-Exam : फ्लश टँकमध्ये मोबाईल लपवून परीक्षेत कॉपीचा प्रयत्न; १८ वर्षीय विद्यार्थ्याला अटक

NEET Paper Leak : लातूरच्या 'क्लास बाजारा'ला फटका; सोशल मीडियातील अफवा पडल्या भारी

Mumbai Rain : मेघगर्जनेसह पावसाचे जोरदार पुनरागमन! वांद्रे-वरळीसह अनेक भागांत मुसळधार सरी, ऑरेंज अलर्ट जारी

Mumbai BEST Strike : अखेर तोडगा निघाला! राज्य सरकारसोबतच्या चर्चेनंतर बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे; बससेवा टप्प्याटप्प्याने पूर्ववत