वंदे भारत मेट्रो (x-@railwaterman)
बिझनेस

फक्त दीड तासात २०० किमी प्रवास! 'या' मार्गावर चालणार नवी Vande Metro Train, किती असणार तिकीट?

भारतीय रेल्वे येत्या काही महिन्यांत 400 वंदे मेट्रो ट्रेन विकसित करण्याचा विचार करत आहे.

Suraj Sakunde

मुंबई: वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) देशभरात सेमी-हाय स्पीड ट्रेनच्या रुपात यशस्वीपणे सुरु आहेत. वंदे भारत एक्सप्रेसनंतर आता भारतीय रेल्वे लवकरच वंदे मेट्रो ट्रेनही (Vande Bharat Metro) सुरू करणार आहे. रिपोर्टनुसार येत्या काही महिन्यांत वंदे भारत मेट्रो कार्यरत होणार आहे.

अवघ्या 1.5 तासात 200 किमी अंतर-

जवळच्या शहरांना जोडण्यासाठी रेल्वे वंदे मेट्रो ट्रेन चालवणार आहे. नवी वंदे मेट्रो देशातील अनेक मार्गांवर चालवली जाणार आहे. दरम्यान, रेल्वेने येत्या काही महिन्यांत दिल्ली ते आग्रा दरम्यान मेट्रो ट्रेन चालवण्याबाबतही चर्चा केली आहे. नवीन वंदे भारत मेट्रो ताशी 160 किमी वेगाने धावेल आणि अवघ्या 1.5 तासात 200 किमी अंतर पार करेल, असे सांगण्यात येत आहे.

ही ट्रेन सकाळी दिल्ली ते आग्रा दरम्यान धावणार असून दैनंदिन कार्यालयासह विविध कामांसाठी जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही गाडी अतिशय सोयीची ठरणार आहे. वंदे भारत मेट्रो ट्रेनची निर्मिती पंजाबमधील कपूरथला येथील रेल कोच फॅक्टरीमध्ये केली जात आहे. अहवालानुसार या ट्रेनची चाचणी जुलैमध्ये होऊ शकते. सध्या वंदे भारत मेट्रोचे ५० डबे तयार केले जात आहेत.

तथापि, भारतीय रेल्वे येत्या काही महिन्यांत 400 वंदे मेट्रो ट्रेन विकसित करण्याचा विचार करत आहे. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित या वंदे भारत मेट्रो ट्रेन 100 ते 250 किमीच्या रेंजमध्ये चालवल्या जातील. यात 12 बोगी (कोच) असतील. आवश्यकतेनुसार ते 16 डब्यांपर्यंत वाढवता येतील. वंदे मेट्रो देशभरातील 124 प्रमुख शहरांना जोडेल, यामध्ये दिल्ली-आग्रा-मथुरा आणि तिरुपती-चेन्नई या मार्गांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.

वंदे भारत मेट्रो ट्रेन पूर्ण एसी कोचने सुसज्ज आहे आणि प्रत्येक डब्यात सुमारे 250 लोक प्रवास करू शकतात. सुरक्षिततेच्या दृष्टीने यात फेयर एंड स्मोक डिटेक्शन सिस्टम, स्वयंचलित दरवाजे आणि आरामदायी आसनांची व्यवस्था करण्यात आली आहे. भारतीय रेल्वे वंदे भारत मेट्रो रेल्वे तसेच वंदे भारत स्लीपर ट्रेन देखील विकसित करत आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी ते अधिक उपयुक्त ठरेल.

GST आता फक्त ५ आणि १८ टक्के; नवीन दराचा ‘घट’ २२ सप्टेंबरपासून

मराठा आरक्षणाच्या जीआरवरून OBC नेत्यांमध्ये मतमतांतरे; जीआर प्रत फाडत लक्ष्मण हाके यांचे आंदोलन; भुजबळांचा कोर्टात जाण्याचा इशारा

Maratha Reservation Protest : सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसान भरपाईचे काय? उच्च न्यायालयाचा मराठा आयोजकांना सवाल

Mumbai : २३८ एसी लोकल खरेदीला मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४८२६ कोटींची मान्यता

कोकणातून परतणाऱ्या गणेशभक्तांचे हाल; मुंबई-गोवा महामार्गावर ३ किमीपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा