मनोरंजन

आकाश ठोसर आणि अभिनेत्री रिंकू राजगुरू यांचा मराठमोळा लूक; आयरा-नुपूरच्या वेडिंग रिसेप्शन पार्टीला लावली हजेरी

मराठमोळा अभिनेता आकाश ठोसर आणि अभिनेत्री रिंकू राजगुरू यांनी आयरा-नुपूरच्या वेडिंग रिसेप्शन पार्टीला हजेरी लावली.

Swapnil S

आमिर खानची मुलगी आयरा खानने उदयपूरमध्ये नुपूर शिखरेसोबत डेस्टिनेशन वेडिंग केल्यानंतर मुंबईत ग्रँड वेडिंग रिसेप्शनचे आयोजन करण्यात आलं होतं. मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये हे रिसेंंप्शेन पार पडले. या रिसेप्शनला बॉलिवूडचे अनेक मोठे सेलिब्रिटींनी हजेरी लावली. या कार्यक्रमातील नवविवाहित जोडप्याची पहिली छायाचित्रेही समोर आली आहेत. आयरा खान आणि नुपूर शिखरे यांनी त्यांच्या खास दिवसासाठी पारंपारिक लुक निवडला आहे. ज्यामध्ये तो खूपच चांगला दिसत आहे.

मराठमोळा अभिनेता आकाश ठोसर आणि अभिनेत्री रिंकू राजगुरू यांनी आयरा-नुपूरच्या वेडिंग रिसेप्शन पार्टीला हजेरी लावली. आयरा-नुपूरच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये आर्ची-परश्याला पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. वेडिंग रिसेप्शन पार्टीतील त्यांचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत आकाश आणि रिंकू फोटोसाठी पापाराझींना पोझ देताना दिसत आहेत..

रिंकूने निळ्या-गुलाबी रंगाची काटपदरची साडी नेसलेली, तर आकाश काळ्या रंगाच्या जोधपुरी सूटमध्ये दिसला. एकमेकांना साजेसा असा लूक दोघांनी केला होता.या रिसेप्शन पार्टीतील दोघांचे फोटो सोशल मीडियावर चांगलेचं व्हायरल होत आहेत.

आयरा-नुपूरच्या मुंबईतील रिसेप्शन सोहळ्यात अनिल कपूर, धर्मेंद्र, रेखा, आशा पारेख यांच्यासोबतच रणबीर कपूर, शाहरुख खान, सलमान खान, कतरिना कैफ, रितेश-जिनिलिया देशमुख या कलाकारांनी उपस्थिती दर्शवली होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेदेखील या बॉलिवूड पार्टीमध्ये पोहोचले होते.

संकटग्रस्त बळीराजाला २,२१५ कोटींची मदत; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

बेकायदा होर्डिंगवर कारवाईसाठी लवकरच नोडल यंत्रणा उभारणार; भोसले समितीचा अहवाल मंत्रिमंडळाने स्वीकारला

‘शहद’ऐवजी आता फक्त ‘शहाड’ स्टेशन! राज ठाकरेंच्या संतापानंतर रेल्वे प्रशासनाचा झपाट्याने निर्णय

सव्वाअकरा लाखांचे पक्षी चोरणारे अटकेत; कर्जत पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

Mumbai Traffic : मुंबईत ठिकठिकाणी वाहतूककोंडी, नागरिक हैराण