मनोरंजन

लक्ष्याची 'ती' सवय शिकायची आहे; अभिनय बेर्डेने शेअर केल्या बाबांच्या आठवणी

शुक्रवार २७ जून रोजी प्रदर्शित झालेला ‘ऑल इज वेल’ हा नवीन मराठी चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरतो आहे. या चित्रपटात अभिनय बेर्डे, प्रियदर्शन जाधव आणि रोहित हळदीकर यांच्या प्रमुख भूमिका असून, चित्रपटाचे दिग्दर्शन योगेश जाधव यांनी केले आहे.

नेहा जाधव - तांबे

शुक्रवार २७ जून रोजी प्रदर्शित झालेला ‘ऑल इज वेल’ हा नवीन मराठी चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरतो आहे. या चित्रपटात अभिनय बेर्डे, प्रियदर्शन जाधव आणि रोहित हळदीकर, सयाजी शिंदे यांच्या प्रमुख भूमिका असून, चित्रपटाचे दिग्दर्शन योगेश जाधव यांनी केले आहे.

चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान 'राजश्री मराठी' या माध्यमाशी संवाद साधताना अभिनेता अभिनय बेर्डे याने आपल्या वडिलांबद्दल दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या भावनिक आठवणी शेअर केल्या. विशेषतः अभिनयने आपल्या वडिलांकडून घेतलेली प्रेरणा आणि त्यांच्या विनोदाच्या अचूक 'Timing' ची सवय आत्मसात करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट केले.

अभिनय म्हणाला, की ''बाबांकडून कोणती सवय घ्यायची असेल तर Timing घ्यायचं आहे. अजून काय घेणार त्यांच्याकडून? लहान तोंडी मोठा घास घेतोय. जसं सचिन तेंडुलकरांच्या खेळाचा Timing आहे, तसा लक्ष्मीकांत बेर्डे यांचा विनोदाचा Timing आहे. ते इतकं अस्खलित, इतकं परफेक्ट आणि इतकं Precise आहे. तो Timing कुठेतरी स्वत: मध्ये आणण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय. त्यांचासारखा हजरजबाबीपणा तुमच्यात येणार नाही. कारण तो Naturally होता. पण, Timing जे त्यांच्याकडे होतं ते त्यांनी Practise ने आणि खूप काम करून, खूप नाटक करून स्वत:हून ते आत्मसात केलं होतं. अशी अशा आहे की ते माझ्यातपण येईल.''

पुढे अभिनय म्हणाला, ''कारण दोन गोष्टी त्यांच्याकडून घेण्यासारख्या आहेत - एक Timing दुसरं प्रामाणिकपणा! त्यांच्या कुठल्याच कामात तुम्हाला खोटेपणा वाटणार नाही. अप्रमाणिकपणा वाटणार नाही. भले मग तो इमोशनल सीन असो विनोदी सीन असो. स्पेशली इमोशनल सीनमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे तुम्हाला कधीच खोटे वाटणार नाहीत. त्यांच्या डोळ्यात जे अश्रू दिसतात ते खरे असतात. हे जाणून घेणं गरजेच आहे.''

‘ऑल इज वेल’ हा विनोदी चित्रपट आहे. मुंबईत अमर, अकबर आणि अँथनी ही तीन अनोळखी पात्रं एकत्र येतात. मोठं यश मिळवण्याच्या स्वप्नात गुंततात, पण त्यांच्या मार्गात येतो ATM चोरीचा खोटा आरोप, घोटाळे आणि गँगस्टरशी संघर्ष. या सगळ्या गंभीर परिस्थितींमध्येही हास्य आणि हलक्याफुलक्या क्षणांची भर पडते, ज्यामुळे हा चित्रपट कॉमेडी ऑफ एररच्या रूपात सादर होतो.

चित्रपटातील कथा, कलाकारांचा अभिनय आणि विनोदी शैली यामुळे ‘ऑल इज वेल’ला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो आहे. अभिनय बेर्डे याचं काम विशेषतः लक्ष वेधून घेत आहे.

महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या समावेशाकडे लागले लक्ष... युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू

IND vs ENG 2025 : क्रिकेटच्या पंढरीत भारताची कसोटी! लॉर्ड्स स्टेडियमवर आजपासून तिसरा सामना, मालिकेत आघाडी घेण्याचे लक्ष्य

लैंगिक छळाच्या तक्रारीनंतर केलेली बदली रद्द; सहाय्यक प्राध्यापक महिलेला उच्च न्यायालयाचा दिलासा

भारतीय वंशाचे सबिह खान Apple चे नवे COO; लवकरच घेणार जेफ विल्यम्स यांची जागा

हॉटेल उद्योगावर मंदीचे सावट; शुल्क कमी न केल्यास ‘हॉटेल बंदचा’ व्यावसायिकांचा इशारा