Instagram
मनोरंजन

Abhishek Bachchan: ऐश्वर्या रायसोबत घटस्फोटाच्या चर्चांवर अखेर अभिषेक बच्चनने सोडलं मौन; म्हणाला...

Tejashree Gaikwad

Abhishek Bachchan, Aishwarya Rai Bachchan: गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडी ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चनच्या यांच्या घटस्फोटाची चर्चा होत आहे. बऱ्याच काळापासून हे जोडपं सार्वजनिक ठिकाणी एकत्र न दिसल्याने याबद्दल सर्वत्र चर्चा आहे. मध्यंतरी अभिषेक बच्चनचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये तो त्याच्या पत्नीपासून म्हणजेच ऐश्वर्या रायपासून घटस्फोट घेण्याबद्दल बोलताना दिसला होता. शिवाय, नुकत्याच झालेल्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाला अभिषेक कुटुंबासोबत तर ऐश्वर्या तिच्या मुलीसोबत आली होती. दोघांच्या अशा वेगवगेळ्या एन्ट्रीमुळे घटस्फोटाच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले. आता अखेरीस या सर्व चर्चांवर अभिषेक बच्चनने मौन सोडलं आहे.

काय म्हणाला अभिषेक?

बॉलिवूड यूके मीडियाला दिलेल्या मुलाखतीत अभिषेकने ऐश्वर्यासोबतच्या घटस्फोटाच्या अफवांवर प्रतिक्रिया देताना, "मी अजूनही विवाहित आहे. मला याबद्दल तुमच्याशी काहीही बोलायचे नाही. दुःखाची गोष्ट म्हणजे तुम्ही सगळ्यांनी सर्व गोष्टी वाढवून-चढवून बोलल्या आहेत. तुम्ही असं का करताय ते मला समजतं...तुम्हालाही काही बातम्या कराव्या लागतात. ठिक आहे. आम्ही सेलिब्रिटी आहोत, त्यामुळे आम्हाला या गोष्टीला सामोरं जावं लागणार” असे म्हटले. यावेळी अभिषेकने स्वतःच्या बोटातील 'एंगेजमेंट रिंग'सुद्धा दाखवली.

अभिषेकच्या व्हायरल व्हिडीओमुळे चर्चांना उधाण

काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर अभिषेकचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये अभिषेक घटस्फोटाबद्दल बोलताना दिसला. 'या जुलैमध्ये मी आणि ऐश्वर्याने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे', असं अभिषेक त्या व्हिडीओमध्ये बोलताना दिसला. त्यानंतर दोघांच्या घटस्फोटाची चर्चा जोर धरु लागली. परंतु हा व्हिडीओ टेक्नॉलॉजीचा वापर करून बनवलेला डीपफेक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हा व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर आणि ऐकल्यानंतरच तो पूर्णपणे फेक असल्याचे स्पष्ट होते.

'हा' आहे खरा व्हिडीओ

व्हायरल झालेला व्हिडीओचा मूळ व्हिडीओ अभिषेक बच्चनच्या इंस्टाग्रामवर आहे. अभिषेक बच्चनने ओरिजनल व्हिडीओ ७ नोव्हेंबर २०२२ रोजी पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये अभिषेक बच्चन 'नन्ही कली' या उपक्रमाबद्दल बोलताना दिसत आहे. याच व्हिडीओचा वापर करून अभिषेकचा फेक व्हिडीओ बनवून व्हायरल करण्यात आला.

अभिषेकने दिलेल्या प्रतिक्रियेमुळे आता अभिषेक आणि ऐश्वर्याच्या चाहत्यांमध्ये आनंद दिसून येत आहे.

मविआचा तिढा सुटला! २६० जागांवर सहमती; २८ जागांवर रस्सीखेच; १-२ दिवसांत जागावाटप जाहीर होणार

पोलिसांवर हायकोर्ट संतापले; अतिरिक्त पोलीस आयुक्तांना हजर राहण्याचे आदेश

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; तिकीट आरक्षणाच्या नियमात बदल; १ नोव्हेंबरपासून होणार लागू

Maharastra Assembly Elections 2024: पक्षांतर्गत बंडाळीच्या धोक्यामुळे महायुती, मविआकडून सावध पवित्रा

नागरिकत्व कायद्यातील अनुच्छेद '६ए' वैध; सर्वोच्च न्यायालयाचा बहुमताने निर्वाळा