मनोरंजन

'आदिपुरुष'च्या बॉक्सऑफिसवर पैशांचा पाऊस

पहिल्या दिवशी १०० कोटींचा आकडा केला पार

नवशक्ती Web Desk

ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' १६ जून रोजी जगभरात प्रदर्शित झाला. वाल्मिकी रामायणावर आधारित सीतेचं अपहरण आणि श्रीरामचंद्र आणि रावणाचं युद्ध दाखवणारी कहाणी मोठ्या पडद्यावर अवतरली.

चित्रपटाचं बजेट तब्बल ५०० ते ६०० कोटी रुपये असल्यामुळे प्रदर्शनापूर्वीच या बिग बजेट चित्रपटाबद्दल चर्चा रंगत होती.

अखेर चित्रपट प्रदर्शित झाला आणि चित्रपटाला समीक्षकांकडून आणि प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. पण बॉक्स ऑफिसवर मात्र याचा फारसा परिणाम झाला नाही. कारण ऍडव्हान्स बुकिंग तेजीत झालं होतं.

प्रभास, कृती सनोन आणि सैफ अली खान यांच्या आदिपुरुष चित्रपटावर बॉक्स ऑफिसवर पैशांचा पाऊस पडलाय. पहिल्या दिवशीचे आकडे समोर आले आहेत. पहिल्या दिवस अखेर चित्रपटाने ९५ कोटी रुपये कमावले. तर जगभरात १४० कोटींची मॅजिक फिगर आदिपुरुष ने गाठली आहे.

चित्रपटाचं ग्लोबल कलेक्शन जोरदार आहे. विकेंडचा फायदा चित्रपटाला नक्कीच मिळेल. त्यामुळे सोमवारपर्यंत २०० कोटी पार करण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

GST आता फक्त ५ आणि १८ टक्के; नवीन दराचा ‘घट’ २२ सप्टेंबरपासून

शिखर धवनला ED कडून समन्स; दोषी आढळल्यास माजी क्रिकेटपटूवर काय कारवाई होणार?

मराठा आरक्षणाच्या जीआरवरून OBC नेत्यांमध्ये मतमतांतरे; जीआर प्रत फाडत लक्ष्मण हाके यांचे आंदोलन; भुजबळांचा कोर्टात जाण्याचा इशारा

मुंबईची वाढती तहान भागवायला आणखी दोन धरणांचा प्रस्ताव

सुप्रीम कोर्टाची राज्य सरकारला नोटीस; कॉ. पानसरे यांच्या कुटुंबीयांच्या याचिकेवर निर्देश