अदिती राव हैदरीचा क्लासी लूक चर्चेत; आयव्हरी साडीने वाढवली शोभा, पाहा Video (Photo-Instagram)
मनोरंजन

अदिती राव हैदरीचा क्लासी लूक चर्चेत; आयव्हरी साडीने वाढवली शोभा, पाहा Video

या पारंपरिक साडीला मॉडर्न ट्विस्ट देताना अदितीने डीप प्लंजिंग नेकलाइन असलेला बेज अर्थात ऑफ-व्हाईटमध्ये ब्राउन टोन रंगाचा ब्लाऊज परिधान केला होता.

किशोरी घायवट-उबाळे

फ्रान्समधील फ्रेंच रिव्हिएरावर सुरू असलेल्या कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२६ मध्ये अभिनेत्री अदिती राव हैदरीने आपल्या पारंपरिक आणि एलिगंट फॅशन स्टेटमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

या आठवड्याच्या सुरुवातीला फ्रान्समध्ये पोहोचल्यानंतर अदितीने तिचा फॅशन लूक शेअर केला होता. आता तिचा आणखी एक रॉयल लूक समोर आला असून यावेळी तिने भारतीय पारंपरिक सौंदर्य जागतिक मंचावर सादर केले आहे.

कान्समध्ये अदितीचा रॉयल साडी लूक

कान्समधील उपस्थितीसाठी अदितीने मोनिका आणि करिश्माच्या 'जेड' ब्रँडची आकर्षक आयव्हरी म्हणजेच ऑफ-व्हाइट शेडची साडी नेसली होती. फ्रेंच रिव्हिएराच्या उन्हात चमकणाऱ्या या साडीत एम्ब्रॉयडरी आणि नाजूक डिटेलिंग करण्यात आले होते.

डीप नेक ब्लाऊजने वाढवली ग्लॅमरची झलक

या पारंपरिक साडीला मॉडर्न ट्विस्ट देताना अदितीने डीप प्लंजिंग नेकलाइन असलेला बेज रंगाचा ब्लाऊज परिधान केला होता. जास्त दागिने न घालता तिने 'इंद्रिया ज्वेल्स'चा मोठा गोल्ड चोकर घालून संपूर्ण लूकला रॉयल टच दिला.

तिने स्टेटमेंट रिंग्स घातल्या होत्या, मात्र इअररिंग्स आणि बांगड्या टाळून संपूर्ण लक्ष नेकलेसवर केंद्रित केले.

रेड लिप्सने खुललं सौंदर्य

अदितीने ग्लोईंग स्किन, हलके फ्लश्ड चीक्स, सौम्य शिमरी आय मेकअप, अचूक आयलाइनर आणि बोल्ड रेड लिप्स असा क्लासिक ब्यूटी लूक निवडला होता.

तिने मधोमध भांग पाडून पोनीटेल हेअरस्टाईल केली होती आणि त्याला गोल्ड लेस लावून पारंपरिक लूक अधिक खुलवला.

याआधी मोनोक्रोम ग्लॅम लूकही चर्चेत

आयव्हरी साडीतील लूकपूर्वी अदितीने एका स्टायलिश कान्स लूकमुळे चाहत्यांचे लक्ष वेधले होते. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती ब्लॅक अँड व्हाईट हॉल्टर-नेक ड्रेसमध्ये दिसली होती.

ब्लॅक-अँड-व्हाईट ड्रेसमध्ये मॉडर्न अंदाज

या ड्रेसमध्ये बोल्ड फ्रंट कट-आउट, टाय-अप बॅक आणि फ्लोईंग स्कर्ट देण्यात आला होता. तिने या लूकसोबत गोल्ड इअररिंग्स आणि रिंग्स घातल्या होत्या.

स्लीक पोनीटेलने वाढवली एलिगन्स

मेकअपसाठी अदितीने आपला सिग्नेचर फ्रेश-फेस्ड लूक कायम ठेवत ग्लोईंग स्किन आणि हलका मेकअप निवडला. तिचे केस स्लीक हाय पोनीटेलमध्ये बांधण्यात आले होते, ज्यामुळे संपूर्ण लूकला मॉडर्न आणि एलिगंट टच मिळाला.

राज्यातील २६५ तालुक्यांत कोरडा दुष्काळ जाहीर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

'लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी एकत्र या'; SIR विरोधात ४ ऑक्टोबरला मुंबईत जनमोर्चा, राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत

सोनं-दागिने दाखवत बनवायची Reel; चोरट्यांनी VIDEO पाहून साधली संधी, घरातून १ कोटींचा ऐवज लंपास

यवतमाळमध्ये वेल्डिंग करताना भीषण स्फोट; दोघांचा जागीच मृत्यू, ५ जण गंभीर जखमी, Video

नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेसवर दगडफेक; खिडक्यांच्या काचा फुटल्या, Video व्हायरल