एव्हरग्रीन गायक अभिजीत सावंत आणि नृत्यांगना गौतमी पाटील लवकरच दिसणार एका खास अंदाजात! AI व्हिडीओने वेधलं प्रेक्षकांचं लक्ष! 
मनोरंजन

एव्हरग्रीन गायक अभिजीत सावंत आणि नृत्यांगना गौतमी पाटील लवकरच दिसणार एका खास अंदाजात! AI व्हिडीओने वेधलं प्रेक्षकांचं लक्ष!

निळशार समुद्र, नारळाच्या बागा आणि अभिजीत गौतमीचा एआय लूक मधला व्हिडिओ सध्या प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेताना दिसतोय.

Krantee V. Kale

निळशार समुद्र, नारळाच्या बागा आणि अभिजीत गौतमीचा एआय लूक मधला व्हिडिओ सध्या प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेताना दिसतोय. काही दिवसांपूर्वी गौतमीने अभिजीत सावंत सोबतचा एक सेल्फी सोशल मीडिया वर शेयर केला होता आणि कमिंग सून असं साजेस कॅप्शन देखील या फोटोला दिलं होत तेव्हा प्रेक्षकांनी हे दोघं सोबत नवीन प्रोजेक्ट करणार असल्याचा अंदाज लावला होता आणि आजच्या या व्हिडिओने त्यावर शिक्कमोर्तब केला आहे.

2025 वर्ष गायक अभिजीत सावंतसाठी अगदीच खास असून या वर्षात त्याने अनेक ट्रेंडिंग गाणी केली. संगीत विश्वात 20 वर्ष पूर्ण करून प्रेक्षकांना पुन्हा एकदा मोहित केलं. कायम एव्हरग्रीन गायक असलेला अभिजीत पुन्हा एकदा चर्चेत आला आणि त्याने नुकतंच आतच्या तरुणाईसाठी मोहब्बत लुटाऊंगा या त्याचा सदाबहार गाण्याचं नवं कोर व्हर्जन देखील गायलं.

अभिजीतने आजवर त्याचा आवाजाने आणि बिग बॉस मधल्या कमाल खेळीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं आहे येणाऱ्या काळात देखील तो अनेक वैविध्यपूर्ण आणि कमाल प्रोजेक्ट्सचा भाग होणार आहे. इंडियन आयडॉल ते आजच्या पिढीला साजेशी ट्रेंडिंग गाणी देणारा तरुणाईचा लाडका गायक ठरतोय.

गौतमी सोबत आता अभिजीत कोणतं नवीन गाणं करतोय ? हा प्रश्न प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा असला तरी लवकरच याच उत्तर प्रेक्षकांना मिळणार असल्याचं कळतंय.

Milk Price Hike : उद्यापासून दुधाचे दर वाढणार; मदर डेअरीचा ग्राहकांना झटका; लिटरमागे ४ रुपयांपर्यंत दरवाढ, पाहा नवे दर

Mumbai : प्रदूषणास कारणीभूत ४४ बांधकामांना 'स्टॉप वर्क नोटीस'; महिनाभरात ४२८ बांधकामांना नोटिसा

वैद्यकीय उपचारासाठी २७० कोटींची मदत; ४० हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना लाभ; BMC ची वैद्यकीय गटविमा योजना ठरली जीवनदायी

आसाममध्ये रेल्वेचा मोठा अपघात! कोलकाता-सैरांग एक्स्प्रेसचे ६ डबे रुळावरून घसरले; बचावकार्य सुरू, Video

"मिस यू दादा! तुझ्याशिवायची ही पहिली भाऊबीज..."; अजित पवारांच्या आठवणीने सुप्रिया सुळे गहिवरल्या