मनोरंजन

Akshay Kumar : अक्षयने शेअर केला महाराजांच्या भूमिकेतला व्हिडीओ; लोकांना आली शरद केळकरची आठवण

महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात'च्या चित्रीकरणाला अक्षय कुमारने (Akshay Kumar) केली सुरुवात, पण नेटकऱ्यांनी केले ट्रोल

प्रतिनिधी

सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनी 'वेडात मराठे वीर दोडले सात' या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अक्षय कुमार (Akshay Kumar) करणार असल्याचे जाहीर केले आणि सर्वांनी यावर टीका केली. या चित्रपटासह अक्षय कुमार हा मराठीमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून अक्षय कुमार त्याचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या लूकमधील एक व्हिडीओ शेअर केला. मात्र, यानंतर नेटकऱ्यांनी त्याला चांगलेच ट्रोल केले. अक्षय कुमारने यापूर्वी 'आधार' या मराठी चित्रपटामध्ये पाहुण्या कलाकाराचे काम केलेले. तर त्याने ३ मराठी चित्रपटांची निर्मितीदेखील केली आहे.

नेटकऱ्यांनी अक्षय कुमारपेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत शरद केळकरला (Sharad Kelkar) पसंती दिली.

काहींनी तर, 'रणवीर सिंगने तुझ्यापेक्षा चांगले काम केले असते,' असेदेखील म्हंटले आहे.

"२० जुलैपर्यंत जिवंत राहीन, नाहीतर भूत बनून परत येईन"; सोनम वांगचुक उपोषणावर ठाम

कल्याण-सीएसएमटी लोकलमध्ये डोंबिवलीहून 'डाउन' प्रवासामुळे राडा; महिलेने थेट पेपर स्प्रे फवारला

Mumbai : प्रस्तावित 'रेल्वे टर्मिनस' लटकले; रेल्वे, संरक्षण मंत्रालयात जमिनीचा वाद

Mumbai : आता कोस्टल रोडमध्ये बहुभाषिक फलक

बोगस पॅथॉलॉजिस्टची चौकशी होणार; NABL चा निर्णय