मनोरंजन

अक्षय कुमार नव्हे, हा तर 'टेलिप्रॉम्प्टर कुमार’; व्हायरल व्हिडिओवरून नेटकऱ्यांनी केले ट्रोल

बॉलीवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. ‘कन्नप्पा’ चित्रपटातील एका दृश्यामुळे त्याच्यावर चाहत्यांनी प्रश्नचिन्ह उभं केलं आहे.

Mayuri Gawade

बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणून इंडस्ट्री गाजवलेल्या अभिनेता अक्षय कुमारने आपल्या भूमिकांनी मोठं यश, लोकप्रियता मिळवली. त्याने आजवर अनेक दमदार चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. सध्या तो 'कन्नप्पा' या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. या तेलुगू पौराणिक चित्रपटात अक्षय भगवान शंकराची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचा त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये अक्षय कुमार चित्रपटातील संवाद बोलताना दिसत आहे. मात्र त्यावेळी अक्षयच्या डोळ्यांच्या हालचालीवरुन तो सरळसरळ टेलिप्रॉम्प्टरवर बघत संवाद वाचत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. काहींनी हा व्हिडीओ झूम करुन अक्षयच्या डोळ्यांमध्ये टेलिप्रॉम्प्टरचं प्रतिबिंब दिसत असल्याचे लक्षात आणून दिले.

ही गोष्ट लक्षात येताच, अनेकांनी अक्षय कुमारला ट्रोल केले. काहींनी त्याच्यावर 'टेलिप्रॉम्प्टर कुमार' अशी टीका केली आहे. अक्षय ने याआधी अनेक मुलाखती दरम्यान सांगितलंय की तो साधारणपणे ४० दिवसांत चित्रपटाची शूटिंग पूर्ण करतो, यावरुन अनेक नेटकरी त्याची खिल्ली उडवत आहेत. "टेलिप्रॉम्प्टरमुळेच ४० दिवसांत शूटिंग पूर्ण होतंय," अशा शब्दांत चाहते त्याला ट्रोल करत आहेत.

दुसरीकडे, काही चाहत्यांनी अक्षयचा बचाव करत, "वर्षभरात अनेक सिनेमे करत असल्याने अशा तांत्रिक गोष्टी गरजेच्या असतात," असं म्हटलंय.

यापूर्वीही 'सरफिरा' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अक्षय कुमार टेलिप्रॉम्प्टर वापरत असल्याची चर्चा झाली होती. पण त्यावेळी अक्षयने कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. आता या प्रकरणावर अक्षय कोणतं स्पष्टीकरण देणार, याची सर्वांना उत्सुकता आहे.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस