मनोरंजन

Bigg Boss Marathi 5: 'लपून सारी, बघुन बारी, डोक्यात त्याच्या गेलंया...' 'बिग बॉस मराठी'चं नवं गाणं ऐकलंत का?

Riteish Deshmukh: रितेश भाऊ त्याच्या स्टाईलने कल्ला करत यंदाचा सीझन रंगवताना दिसत आहे. आता आपल्या हक्काच्या भाऊच्या धक्क्यावर भाष्य करणारं एक नवं कोरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

Tejashree Gaikwad

Bigg Boss Marathi New Season : टेलिव्हिजनचा सर्वात मोठा कार्यक्रम अर्थात 'बिग बॉस मराठी'च्या नव्या पर्वाची सर्वत्र चांगलीच हवा आहे. रितेश भाऊची हटके स्टाईल आणि १६ सदस्यांचा हटके खेळ चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. काहीच तासांत यंदाच्या सीझनचा पहिला 'भाऊचा धक्का' पार पडणार आहे. या 'भाऊच्या धक्क्या'वर सदस्यांची पोलखोल होणार आहे. पण त्याआधीच 'भाऊचा धक्का' हे गाणं 'बिग बॉस'प्रेमींच्या भेटीला आलं आहे.

'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन पूर्णपणे वेगळा आहे. रितेश भाऊ त्याच्या स्टाईलने कल्ला करत यंदाचा सीझन रंगवताना दिसत आहे. आता आपल्या हक्काच्या भाऊच्या धक्क्यावर भाष्य करणारं एक नवं कोरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

"लपून सारी, बघुन बारी, डोक्यात त्याच्या गेलंया,

साऱ्यांना टाईट, करणार राईट, हिशोब त्यानं केलंया,

हटके स्टाईल, किलर स्माईल, धिंगाना याचा करंलं", असे या गाण्याचे बोल आहेत. रितेश भाऊ कोणाची शाळा घेईल तर कोणाचं कौतुक करेल. एकंदरीतच भाऊच्या धक्क्यावर तो स्पर्धकांचा हिशोब घेणार आहे. त्यामुळे कल्ला तर होणारच...

'भाऊचा धक्का' या गाण्यात रितेश भाऊचा रुबाब पाहायला मिळत आहे. त्याचा हटके स्वॅग स्टाईल आणि उत्साह या गाण्यात परफेक्ट दिसून येत आहे. रितेश भाऊ 'भाऊच्या धक्क्यावर' घरातील सदस्यांचा हिशोब पक्का करणार आहे. त्यामुळे हा 'भाऊचा धक्का' चांगलाच गाजणार.

ठाकरे बंधूंची यंदा 'एकत्र' दिवाळी! मनसे दीपोत्सवाचे उद्घाटन उद्धव ठाकरेंच्या हस्ते

वडिलांपेक्षा मुलगा वयाने मोठा कसा? सर्वपक्षीय शिष्टमंडळाची निवडणूक आयोगासमोर प्रश्नांची सरबत्ती, राज ठाकरेंच्या प्रश्नांनी वेधले लक्ष

IPS पूरन कुमार प्रकरणाला नवे वळण; तपास करणाऱ्या IAS अधिकाऱ्याचीही आत्महत्या, सुसाइड नोटमध्ये गंभीर आरोप

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण : मुख्य आरोपी वीरेंद्र तावडेसह दोघांना जामीन

जैसलमेरमध्ये भीषण अपघात; खासगी बसला अचानक लागली आग, गाडी जळून खाक, ५७ जण करत होते प्रवास