दरवर्षी, चाहते जगातील सर्वात मोठ्या फॅशन इव्हेंटची, मेट गालाची आतुरतेने वाट पाहतात. जगातील सर्वात मोठा फॅशन इव्हेंट मेट २०२४ गाला हा यंदा ६ मे रोजी सुरू झाला. न्यूयॉर्क शहरातील मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टमध्ये आयोजित मेट गाला या इव्हेंटमध्ये अनेक स्टार्सने हजेरी लावली. दीपिका पदुकोण, ऐश्वर्या राय आणि प्रियांका चोप्रा यांसारख्या अभिनेत्रींनंतर, आलिया भट्टने अलीकडेच न्यूयॉर्क शहरातील मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टमध्ये आयोजित मेट गाला २०२४ मध्ये सहभाग घेतला. यावेळी तिने कोणताही वेस्टर्न आऊटफिट न निवडता भारतीय पोशाख साडीला पसंती दिली. तिने डिझायनर साडी नेसून आंतरराष्ट्रीय कार्यक्रमच्या रेड कार्पेटवर हजेरी लावतभारतीय संस्कृतीचा झेंडा फडकवला.
राजकुमारीसारखा लूक!
आलिया भट्ट मेट गाला २०२४ मध्ये प्रसिद्ध डिझायनर सब्यसाचीची फ्लोरल साडी परिधान करून आली होती. ही साडी बनवण्यासाठी १६३ कारागिरांनी १९६५ तास मेहनत घेतली अशी माहिती समोर आली आहे. ही साडी परिधान करून आलिया भट्ट एखाद्या सुंदर राजकुमारीपेक्षा कमी दिसत नव्हती.
यंदाच्या 'मेट गाला'ची थीम 'गार्डन ऑफ टाइम: ॲन ऑड टू आर्ट अँड इटरनिटी' अशी होती. याचमुळे या खास इव्हेंटसाठी भारतीय अभिनेत्री आलिया भट्टने पांढऱ्या फुलांची साडी निवडली. ही साडी भारतीय फॅशन डिझायनर सब्यसाचीने डिझाइन केली होती. या सुंदर साडीत आलिया भट्ट एखाद्या राजकुमारीसारखी दिसत होती.
लूकला साजेशी साडी
भारतीयांसाठी साडी हे परंपरा आणि नवनिर्मितीचे प्रतीक आहे. फॅशन डिझायनर सब्यसाचीने यंदाच्या थीमला साजेशी अशी साडी बनवली आहे. यामध्ये या पृथ्वी, आकाश आणि समुद्राचे रंग समाविष्ट आहेत, जे अभिनेत्रींचे सौंदर्य आणखीनच वाढवत आहेत. ही साडी हाताने भरतकाम, मौल्यवान खडे आणि झालरांनी बनवली गेली आहे. साडीतील झालर ही १९२० च्या काळातील एक खास स्टाईल आहे. फिकट हिरवी साडी आणि त्याचा हा सुंदर लांब पल्लू या लुकमध्ये अजूनच चार चांद लावतो. या लूकची सगळीकडे चर्चा आहे. चाहते तिच्या लूकची तुलना तिने गेल्या वर्षी परिधान केलेल्या पर्ल गाउनशी करताना दिसतात.