मनोरंजन

'आदिपुरुष' सिनेमातील दुसरं गाणं 'राम सिया राम' यूट्यूबवर ट्रेंडिंग; एका तासात मिळाले 'इतके' व्ह्यूज

या गाण्याला रिलीज झाल्यानंतर एका तासात 1.2 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.

नवशक्ती Web Desk

सध्या 'आदिपुरुष' या सिनेमाची सगळीकडे चर्चा सुरु आहे. मागे या सिनेमातील 'जय श्री राम' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. त्या गाण्याणे अक्षय कुमारच्या 'क्या लोगे तुम' या गाण्याला मागे टाकलं होते. आता 'आदिपुरुष' या सिनेमातील दुसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 'राम सिया राम' हे गाणं सध्या युट्यूबर पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे. प्रेक्षकांनी या गाण्याला डोक्यावर घेतल्याचे दिसून येत आहे. या गाण्याला रिलीज झाल्यानंतर एका तासात 1.2 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.

सोशल मीडियावर होतंय व्हायरल

'आदिपुरुष' मधील दुसरं गाणं 'राम सिया राम' हे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीला उतरल्याचे दिसून येत आहे. लोकप्रिय गीतकार मनोज मुंतसिर शुक्ला यांनी या गाण्याचे बोल लिहले आहेत. तर परंपरा टंडन आणि सचेत टंडन यांनी हे गाणं गायलं आहे.

या गाण्यात राम आणि सिता यांचं प्रेम दाखवण्यात आलं आहे. हे गाण हिंदी, तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम या पाच भाषांमध्ये प्रदर्शित झालं आहे. टी-सीरिजच्या युट्यूब चॅनलवर हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासने हे गाणं शेअर करत "आदिपुरुष'चा आत्मा" असं लिहिलं आहे.

'आदिपुरुष' या चित्रपटाची 700 कोटींच्या बजेटमध्ये निमिर्ती करण्यात आली आहे. येत्या 16 जून रोजी हा सिमेना प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. घोषणा झाल्यापासूनच हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. तरी देखील सिनेप्रेमींना सिनेमाविषयी उत्सूकता आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिस किती यशस्वी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. प्रभास, कृती सेनन, सनी सिंह, देवदत्त नागे हे कलाकार या सिनेमात महत्वाच्या भूमीकेत आहेत.

'जय श्री राम' हे या सिनेमातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं होते. लोकप्रिय संगितकार अजय-अतुल यांनी या गाण्याचं संगीत दिग्दर्शन केलं आहे. 'राम सिया राम' आणि 'जय श्री राम' या दोन्ही गाण्यांना प्रेक्षकांनी भरगोस प्रतिसाद दिला आहे.

बोलणी फिस्कटली; आंदोलन सुरूच! मनोज जरांगे-शिंदे समिती यांच्यातील चर्चा निष्फळ, हैदराबाद गॅझेट लागू करण्यास सरकारची तत्त्वतः मंजुरी

रेल्वे स्टेशनमध्ये दोन दिवस राहा फक्त दहा रुपयांत...आंदोलकांच्या व्हॉट्सअपवर मेसेज व्हायरल, वाशीतील एक्झिबिशन सेंटरमध्ये व्यवस्था

मराठा आंदोलकांनी केला चक्काजाम; जरांगे-पाटील यांच्या आवाहनानंतर रस्ता मोकळा

इशाऱ्यानंतर पालिका प्रशासनाचे नमते! फिरत्या शौचालयासह पुरवल्या इतर सुविधा; आंदोलकांसाठी पाण्याचे टँकर्सही अखेर उपलब्ध

Maratha Reservation Protest : मुंबईच्या रस्त्यांवर संगीत, नृत्य आणि कठपुतळीचा नाचही!