निवृत्तीच्या घोषणेनंतर पहिल्यांदाच स्टेजवर परतला अरिजीत सिंग; कोलकत्यातील परफॉर्मन्सचा व्हिडिओ व्हायरल 
मनोरंजन

निवृत्तीच्या घोषणेनंतर पहिल्यांदाच स्टेजवर परतला अरिजीत सिंग; कोलकत्यातील परफॉर्मन्सचा व्हिडिओ व्हायरल

निवृत्तीच्या घोषणेनंतर अरिजीतने पहिल्यांदाच लाईव्ह स्टेज परफॉर्मन्स दिला असून, कोलकत्यातील या कार्यक्रमाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Mayuri Gawade

बॉलीवूडचा लोकप्रिय गायक अरिजीत सिंगने अलीकडेच पार्श्वगायनातून निवृत्ती जाहीर केल्यानंतर चाहत्यांमध्ये निराशेचं वातावरण होतं. मात्र आता अरिजीतच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. निवृत्तीच्या घोषणेनंतर अरिजीतने पहिल्यांदाच लाईव्ह स्टेज परफॉर्मन्स दिला असून, कोलकत्यातील या कार्यक्रमाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

कोलकत्यात अनुष्का शंकरसोबत स्टेज शेअर

रविवारी (दि.८) कोलकात्यात पार पडलेल्या एका संगीत कार्यक्रमात अरिजीत सिंगने सुप्रसिद्ध संगीतकार अनुष्का शंकरसोबत स्टेज शेअर केलं. निवृत्तीनंतरचा हा अरिजीतचा पहिलाच लाईव्ह परफॉर्मन्स ठरला. स्टेजवर अरिजीतचा उत्साह आणि आनंद स्पष्टपणे दिसून येत असून, चाहत्यांनी हा क्षण भावूक होऊन अनुभवला.

व्हायरल व्हिडिओ पाहा

व्हायरल व्हिडिओवर चाहत्यांच्या भावनिक प्रतिक्रिया

या लाईव्ह परफॉर्मन्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहेत. अनेक चाहत्यांनी अरिजीतच्या परफॉर्मन्सवर प्रतिक्रिया देत आनंद व्यक्त केला आहे. "अरिजीत स्टेजवर किती आनंदी आणि मुक्त दिसतोय, हे पाहून मन भरून येतं," अशी प्रतिक्रिया एका चाहत्याने दिली आहे. तर काही चाहत्यांनी पुन्हा कोलकत्यात अरिजीतचा पूर्ण कॉन्सर्ट कधी होणार, याबाबत उत्सुकता व्यक्त केली आहे.

निवृत्तीचा निर्णय ..

गेल्या महिन्यात अरिजीत सिंगने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत, आपण आता नव्या पार्श्वगायनाच्या कामातून माघार घेत असल्याचं जाहीर केलं होतं. या पोस्टमध्ये त्याने चाहत्यांचे आभार मानत, हा प्रवास सुंदर होता, असं म्हटलं होतं. त्याच्या या निर्णयामुळे संगीतप्रेमींना मोठा धक्का बसला होता.

जरी अरिजीतने पार्श्वगायनातून निवृत्ती जाहीर केली असली, तरी त्याने याआधी रेकॉर्ड केलेली काही गाणी आगामी काळात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही महिन्यांत अरिजीतचा आवाज प्रेक्षकांना चित्रपटांमध्ये ऐकायला मिळू शकतो.

निवृत्तीनंतरही स्टेजवर अरिजीतचा उत्साह पाहून, त्याचे चाहते पुन्हा एकदा सुखावले असून, ‘अरिजीत सिंग लाईव्ह’चा अनुभव घेण्याची त्यांची इच्छा अधिकच वाढली आहे.

TCS प्रकरणात दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची टीम चौकशीसाठी नाशिकमध्ये; १५० कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम'चे निर्देश

गोरेगावमधील मोतीलालनगर पुनर्विकासाचा मास्टर प्लान लवकरच; उच्च दर्जाच्या सार्वजनिक पायाभूत सुविधा उपलब्ध होणार

VIDEO : लखनऊमधील झोपडपट्टीत भीषण आग; सिलिंडर स्फोटांमुळे शेकडो झोपड्या जळून खाक, अनेक कुटुंबे बेघर

Mumbai : परळ स्थानकाचे पुन्हा नूतनीकरण; विस्तारीकरणासाठी नव्या बांधकामावर हातोडा?

Bigg Boss Marathi 6: पहिली फायनलिस्ट तन्वी कोलते अडचणीत? 'त्या' वक्तव्यामुळे सोशल मीडियावर संताप, विजेतेपदाच्या चर्चेला नवं वळण