मनोरंजन

आशिष विद्यार्थी यांच्या पहिल्या पत्नीच्या पोस्ट चर्चेत; म्हणाल्या जीवनाच्या कोड्यात...

या पोस्टवरुन त्यांना जीवनात अनेक चढ उतारांचा सामना करावा लागत असल्याचे दिसून येत आहे

नवशक्ती Web Desk

सुप्रसिद्ध अभिनेते आशिष विद्यार्थी यांची बॉलिवूडचे सुप्रसिद्ध व्हिलन अशी देखील ओळख आहे. आशिष हे दुसऱ्यांदा विवाह बंधनात अडकले आहेत. ते वयाच्या 60 व्या वर्षी पुन्हा बोहल्यावर चढले असून त्यांनी आसामच्या रुपाली बरुआ यांच्याशी कोर्ट मॅरेज करत नव्या वैवाहिक आयुष्याला सुरुवात केली आहे. आशिष यांनी रुपाली बरुआ सोबत लग्नगाठ बांधल्यानंतर त्यांच्या पहिली पत्नी राजोशी बरुआ म्हणजेच पीलू विद्यार्थीची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी एक पोस्ट शेअर करत तिचे मत मांडले आहे.

राजोशी यांनी केलेली पोस्ट सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. या पोस्टवरुन त्यांना जीवनात अनेक चढ उतारांचा सामना करावा लागत असल्याचे दिसून येत आहे. राजोशी यांनी केलेल्या पहिल्या पोस्ट मध्ये त्यांनी "योग्य व्यक्ती तुम्हाला कधीही तुम्ही त्याच्यासाठी काय आहात, हा प्रश्न विचारणार नाही. तसेच तुम्हाला त्रास होईल, असेही तो कधीच वागणार नाही. हे कायम लक्षात ठेवा", असे त्यांनी म्हटले आहे.

त्यांनी इन्स्टाग्रामवर दुसरी पोस्ट शेअर करत म्हटले की, "आता कदाचित अतिविचार आणि संशय या गोष्टी तुमच्या मनातून निघून गेल्या असतील. गोंधळा ऐवजी तुमच्या मनात स्पष्टा असेल. शांती आणि संयमान तुमचे जीवन भरलेले असेल. बऱ्याच काळापासून तुम्ही खंबीर असाल आणि आता तुम्हाला आशिर्वाद मिळण्याची वेळ आली आहे. कारण त्यासाठी तुम्ही पात्र आहात", असे त्यांनी त्यांच्या दुसऱ्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

तसेच आशिष विद्यार्थी यांनी रुपाली यांच्याशी केलेल्या कोर्ट मॅरेजनंतर राजोशी यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी एक फोटो शेअर केला आहे. ज्यात राजोशी या हसताना दिसत आहेत. त्यांनी या फोटोला "जीवनाच्या कोड्यात अडकू नका, हे जीवन आहे", असे कॅप्शन दिले आहे.

राजोशी यांनी केलेल्या इन्स्टाग्राम पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. राजोशी यांना एक 23 वर्षाचा मुलगा आहे.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस