बाळासाहेब ठाकरेंचा नातू करणार बॉलिवूडमध्ये 'एन्ट्री', अनुराग कश्यपच्या चित्रपटात साकारणार भूमिका  @aaishvarythackeray (Insta)
मनोरंजन

बाळासाहेब ठाकरेंचा नातू करणार बॉलिवूडमध्ये 'एन्ट्री', अनुराग कश्यपच्या चित्रपटात साकारणार भूमिका

बातमी आहे सिनेमा आणि राजकीय विश्वातील. बाळासाहेब ठाकरे यांचा नातू ऐश्वर्य ठाकरे हा लवकरच सिनेविश्वात पदार्पण करणार आहे. तो प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप याच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. त्यामुळे राजकीय आणि सिनेविश्वात याची चर्चा होत आहे.

Kkhushi Niramish

बातमी आहे सिनेमा आणि राजकीय विश्वातील. बाळासाहेब ठाकरे यांचा नातू ऐश्वर्य ठाकरे हा लवकरच सिनेविश्वात पदार्पण करणार आहे. तो प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप याच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. त्यामुळे राजकीय आणि सिनेविश्वात याची चर्चा होत आहे.

कोण आहे ऐश्वर्य ठाकरे?

ऐश्वर्य ठाकरे हा बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा जयदेव ठाकरे आणि स्मिता ठाकरे यांचा धाकटा मुलगा आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा तो पुतण्या आणि आदित्य ठाकरे यांचा चुलत भाऊ आहे. ऐश्वर्य याला मोठा राजकीय वारसा लाभला असूनही त्याने राजकारणात न जाता अभिनय क्षेत्रात करिअर घडवण्याचा निर्णय घेतला आहे. तो सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह असून त्याचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. त्याच्या पोस्ट्सला चाहत्यांकडून मोठी पसंती मिळत असते.

ऐश्वर्य ठाकरेला आहे सिनेमांची आवड

ऐश्वर्य ठाकरे याला सिनेमांची आवड असून त्याने यापूर्वी संजय लीला भन्साळी यांच्या 'बाजीराव मस्तानी' चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक काम केले होते. यावेळी त्याने अभिनयाचेही धडे घेतले. याशिवाय त्याला नृत्याची देखील आवड आहे.

काय आहे चित्रपटाचे नाव? ऐश्वर्यची भूमिका काय?

अनुराग कश्यप हा 'गँग्स ऑफ वासेपूर'च्या पार्श्वभूमीवर तशाच धाटणीचा एक नवीन चित्रपट बनवत आहे. 'निशानची' असे या चित्रपटाचे नाव आहे. जार पिक्चर्सने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

चित्रपटात ऐश्वर्य हा उत्तर भारतातील छोट्या शहरांमधून आलेल्या एका स्वयंप्रशिक्षित शूटरची भूमिका साकारताना दिसणार आहे. तो उत्तर भारतातील एका छोट्या भागातून आलेला शूटर असून तो त्याच्या वयाच्या शूटर्सपेक्षा माहिर आहे. त्यामुळे तो आपल्या समवस्कांच्या खूप पुढे आहे. भूमिकेसाठी ऐश्वर्यने उत्तर भारतातील तरुणांची बोली, त्यांचे उच्चारण यांचा अभ्यास करून त्याचप्रकारे बोलण्याचे कौशल्य विकसित केले. हा चित्रपट ऐश्वर्यला 2020 मध्ये मिळाला होता. त्यानंतर त्याने दोन वर्षे येथील बोलीभाषा आणि देहबोलीवर काम केले.

चित्रपटाचे कथानक 1996 पासून 2016 असा 20 वर्षांच्या कालावधीत फिरते. ही एक सूडाची कहानी आहे. गँग्स ऑफ वासेपूरमध्ये ज्याप्रमाणे रामधीर सिंग आणि सरदार खान यांच्यातील कौटुंबक कलह दाखवण्यात आला होता. तसाच संघर्ष निशानचीमध्ये देखील आहे. यामध्ये कुमुद मिश्रा हा रामधीर सिंह सारखी भूमिका साकारत आहे. तर, विनीत सिंग हा सरदार खान सारखी भूमिका साकारत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून सध्या पोस्ट प्रोडक्शनचे काम सुरू आहे. 'निशानची' चित्रपटात 'जामतारा' वेबसिरीजमधून ओळख मिळवलेली मोनिका पवार देखील दिसणार आहे. चित्रपटाचे चित्रीकरण उत्तर प्रदेशात पूर्ण करण्यात आले आहे.

चित्रपटात आहेत 20 गाणी

अनुरागच्या अन्य चित्रपटांप्रमाणेच निशानची देखील एक संगीतमय चित्रपट आहे. या चित्रपटात 20 गाणी आहेत. पियुष मिश्रा यांच्या कवितांमधून यातील बरीच गाणी घेतली आहेत. पियुषने या कविता त्यांच्या नाटकांसाठी केल्या होत्या.

BCCI कडून महाभियोगची तयारी; कुणकुण लागताच मोहसीन नक्वींनी UAE बोर्डाकडे सुपूर्द केली ट्रॉफी : रिपोर्ट

आजपासून भारत आणि EFTA व्यापार करार अंमलात; पुढील १५ वर्षांत १०० अब्ज डॉलरची गुंतवणूक होणार

नवी मुंबई विमानतळाला अखेर ‘एअरोड्रोम परवाना’; ८ ऑक्टोबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्‌घाटन

रिलायन्स इन्फ्रावर ‘ईडी’चे छापे; फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप

गोकुळकडून दूध उत्पादकांना दिवाळी भेट; १३६ कोटींचा ‘दरफरक’ जमा होणार