Instagram
मनोरंजन

Manoj Bajpayee: 'भैय्या जी' मनोज बाजपेयीचा १००वा सिनेमा 'या' दिवशी होणार प्रीमियर

Tejashree Gaikwad

भारतातील सर्वात मोठा स्वदेशी व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म झी५, मनोज बाजपेयीचा १०० वा सिनेमा म्हणून प्रसिद्धी मिळवलेला, वरच्या दर्जाचा अॅक्शन रिव्हेंज ड्रामा 'भैय्या जी' च्या जागतिक डिजिटल प्रीमिअरची घोषणा करण्यास उत्सुक आहे. अलीकडेच झी५वर १ अब्ज वॉच टाइमचा टप्पा ओलांडलेल्या 'सिर्फ एक बंदा काफी है' च्या अफाट यशानंतर, 'भैय्या जी' या अष्टपैलू अभिनेत्याचा यापूर्वी कधीही न पाहिलेला अवतार दर्शविणारी सूड आणि न्यायाची आणखी एक मनोरंजक कथा सादर होणार आहे. २५ जुलैपासून, प्रेक्षक मनोज बाजपेयीच्या लार्जर दॅन लाइफ व्यक्तिरेखेचे चित्रण पाहू शकतात. ज्यात उत्तर प्रदेश-बिहारच्या अंतर्गत भागाची तीव्रता आणि दक्षिण भारतीय सिनेमाच्या उत्कंठावर्धक करिश्मा यांचा मिलाफ दिसेल.

दूरदर्शी अपूर्व सिंग कार्की दिग्दर्शित आणि विनोद भानुशाली, कमलेश भानुशाली, समीक्षा ओसवाल, शेल ओसवाल, शबाना रझा बाजपेयी आणि विक्रम खाखर यांच्या धडाकेबाज टीमच्या पाठिंब्याने, सूड आणि न्यायाचा हा थरारपट पडद्याला आग लावण्यासाठी सज्ज आहे. हा सिनेमा झी५ ओरिजनलवर अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या 'सिर्फ एक बंदा काफी है' च्या निर्मात्यांकडून आला आहे. २६ जुलै ही तारीख दिनदर्शिकेवर चिन्हांकित करा कारण 'भैय्या जी' चा वर्ल्ड डिजिटल प्रीमिअर केवळ झी५ वर पाहता येईल.

अनेकदा ओटीटीचा स्टार म्हणून ओळखला जाणारा मनोज बाजपेयी, झी५वर आपल्या नावावर अनेक यशस्वी प्रकल्पांसह दमदार उपस्थिती नोंदवत उभा आहे. ज्यात 'सायलेन्सः कॅन यू हियर इट? ', 'सायलेन्स २: द नाईट आऊल बार शूटआउट', 'सिर्फ एक बंदा काफी है', 'डायल १००', 'जागो', 'सूरज पे मंगल भारी', 'चक्रव्यूह' आदी सिनेमे प्रदर्शित झाले आहेत. झी५ वरील स्वत:च्या अष्टपैलू कामगिरीने आता हा अभिनेता प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनला असून 'भैय्या जी' ही कलाकृती ओटीटीच्या जगात मनोजने राखलेला अभिनयसंपन्न वारसा आणखी मजबूत करण्यासाठी सज्ज आहे.

गुन्हेगारीतून माघार घेतलेला आणि भेदरलेल्या, आपल्या धाकट्या भावाच्या क्रूर हत्येचा सूड घेण्याची इच्छा असलेल्या भैय्या जी’चा प्रवासावर या सिनेमात पाहायला मिळेल. क्षुल्लक वादविवादामुळे शोकांतिकेचा जन्म होतो, तेव्हा भैय्या जी स्वत:च्या शांततामय निवृत्तीतून परतात आणि त्यांच्या भावाच्या हत्त्येसाठी जबाबदार असलेल्या शक्तिशाली गुज्जरचा सामना करतात. स्वत:च्या निष्ठावंत सहकाऱ्यांना एकत्र करून, सूड उगवण्याची एक भयंकर मोहीम पेटते. ज्यामुळे संपूर्ण गुन्हेगारी विश्व उलथवून टाकण्याचा धोका निर्माण होतो. पण जसजसा धोका वाढतो, संकट बळावते, तसतशी भैय्याजींच्या प्रतिशोधाला खूप जास्त किंमत मोजावी लागेल का?

झी५चे चीफ बिझनेस ऑफिसर मनीष कालरा म्हणाले, “सिर्फ एक बंदा काफी है 'च्या निर्मात्यांसोबत पुन्हा एकत्र ' भैय्या जी 'ला झी५ मध्ये आणताना आम्हाला आनंद होत आहे. हा सिनेमा मनोजची केवळ १००वी कलाकृती उपक्रम नसून त्याला अभूतपूर्व अवतारात दाखवते. जिच्यात तीव्रता आणि भव्यतेचे मिश्रण करतो. 'सिर्फ एक बंदा कॉफी है' ने १ अब्जाहून अधिक वॉच टाइम गाठला आहे आणि आता 'भैय्या जी' ही गती कायम ठेवत, आम्हाला उच्च-प्रभाव असलेला कंटेंट वितरीत करण्याचा विश्वास आहे. भैय्या जी झी५च्या वचनबद्धतेला बळकटी देते. अत्याधुनिक मनोरंजनासाठी अंतिम गंतव्यस्थान म्हणून झी५चे स्थान आणखी मजबूत करते.”

झी५वर सिनेमाच्या प्रीमिअरपूर्वी, भैय्या जी उर्फ मनोज वाजपेयी म्हणाला, "भैय्या जी हा माझ्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा म्हणावा लागेल. कारण हा माझा १०० वा सिनेमा आहे आणि या आकर्षक पात्राला जिवंत करण्याची संधी मला लाभली हा खरोखरच माझा सन्मान आहे. 'सिर्फ एक बंदा काफी है' ने झी५ वर १ अब्जाहून अधिक वॉच टाइमचा टप्पा गाठला. आता 'भैय्या जी' ने ही गती कायम ठेवली आहे, कथाकथनाला प्रेक्षकांनी दाखविलेल्या प्रेमाची ही पोचपावती आहे. मी साकरणार असणारी भूमिका माझ्या नेहमीच्या चित्रणापेक्षा खूपच वेगळी आहे. ज्यात भव्य शैलीसह उत्तर प्रदेश-बिहारच्या मध्यवर्ती भागातील खडतर वास्तववादाचा मिलाफ आहे. एक बहुआयामी, आयुष्यापेक्षा मोठे व्यक्तिमत्व शोधण्याची ही एक अनोखी संधी होती. मला विश्वास आहे की प्रेक्षक ही व्यक्तिरेखा स्वीकारतील. आम्ही जगभरातील ZEE5 च्या प्रेक्षकांसमोर 'भैय्या जी' सादर करत असताना, हा नवीन अवतार आणि आम्ही तयार केलेली उत्कट कथा पाहण्यासाठी मी उत्सुक आहे. येथे आशा आहे की आम्हाला ओटीटी प्रेक्षकांकडून तितकेच प्रेम आणि पाठिंबा मिळेल जितके आम्ही सिनेमागृहात प्रदर्शित करण्यासाठी दिले होते."

दिग्दर्शक अपूर्व सिंग कार्की यांनी नमूद केले की, "भैय्या जी डिजिटल कथाकथनातील एक धाडसी झेप दर्शवते. आम्ही एक कथा तयार केली. जी एका महाकाव्याच्या विस्तारासह वास्तववादी गुन्हेगारी नाटकाच्या जिद्दीशी जुळते. मनोज सरांसोबत पुन्हा काम करणे परिवर्तनशील ठरले. या बहुस्तरीय आणि गुंतागुंतीच्या पात्राला मूर्त रूप देण्याचे त्यांचे समर्पण खरोखरच प्रेरणादायी आहे. आम्ही निष्ठा, कुटुंब आणि हिंसाचाराचे चक्रीय स्वरूप या संकल्पनांचा अशा प्रकारे शोध घेतला. प्रेक्षकांना कथानक भावेल असा विश्वास मला आहे. या प्रकल्पाने आमच्या संपूर्ण टीमला सर्जनशील, तांत्रिक आणि भावनिकदृष्ट्या प्रेरित केले आहे. मनोज सरांचा १०० वा सिनेमा म्हणून, खरोखरच काहीतरी विशेष निर्माण करण्याची जबाबदारी आम्हाला जाणवली. मला विश्वास आहे की झी५वरील प्रीमियर 'भैय्या जी' डिजिटल सिनेमाच्या परिघापवर देखील कायमस्वरूपी प्रभाव टाकेल.

निर्माते विनोद भानुशाली म्हणाले, "मनोज बाजपेयीची निर्मिती असलेला 'भैय्या जी' हा एक सर्वोत्कृष्ट देशी शैलीतील अॅक्शन रिव्हेंज ड्रामा आहे. ज्याने सिनेमागृहातील प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्याचा १०० वा सिनेमा चाहत्यांसाठी एक रोमांचक अनुभव देईल. आता प्रेक्षक झी५वर स्वत:च्या घरी आरामात रोमांचित आनंद घेऊ शकतात. भानुशाली स्टुडिओजचा मनोजजी आणि अपूर्व यांच्यासोबत प्रदर्शित झालेला 'सिर्फ एक बंदा काफी है' हा सिनेमाने मंचावर १ अब्जपेक्षा अधिक वॉच टाइम मिळवला होता.

शबाना रझा बाजपेयी यांनी ‘भैय्या जी’विषयीचे आपले विचार मांडले, ते म्हणाले, "भैय्या जी हा मनोजसाठी केवळ आणखी एक मापदंड नसून त्याचा अविश्वसनीय प्रवास आणि कलेबद्दलच्या उत्कटतेचे प्रतीक आहे. त्याचा १०० वा सिनेमा म्हणून, तो आमच्या हृदयात एक विशेष स्थान राखून आहे. औरेगा स्टुडिओज अंतर्गत या सिनेमाची निर्मिती करणे हा एक अत्यंत फायदेशीर अनुभव आहे. झी५वर जागतिक डिजिटल प्रीमिअरबद्दल मी रोमांचित आहे. दंग करणारी अॅक्शन आणि खोल भावनिक नाट्यासह, भैय्या जी पाहणे आवश्यक आहे. प्रेक्षक भैय्या जी ला आपलेसे हा विश्वास मला वाटतो".

निर्मात्या समीक्षा शेल ओसवाल म्हणाल्या, "मनोज वाजपेयीच्या १०० व्या सिनेमाची निर्मिती म्हणजे चाहत्यांसाठी सिनेमॅटीक एक्सपिरियन्स ठरेल. 'भैय्या जी' हा मनोज बाजपेयीच्या अॅक्शन अभिनयातील एक रोमांचक पुनरागमन असेल, जे चाहत्यांना आता त्यांच्या घरी झी५सह एक मनोरंजक अनुभव मिळवून देईल.

मविआचा तिढा सुटला! २६० जागांवर सहमती; २८ जागांवर रस्सीखेच; १-२ दिवसांत जागावाटप जाहीर होणार

पोलिसांवर हायकोर्ट संतापले; अतिरिक्त पोलीस आयुक्तांना हजर राहण्याचे आदेश

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?