छाया : विजय गोहील
मनोरंजन

भीमराव पांचाळे यांना लता मंगेशकर पुरस्कार प्रदान; महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचा हीरक महोत्सवी सोहळा

गझल हा लोकप्रिय गानप्रकार सुफी संतांमुळे भारतात रुजला. गझल हेच व्रत म्हणून घेणारे भीमराव पांचाळे. ‘आयुष्य तेच आहे अन् हाच पेच आहे’, असे म्हणत त्यांनी मराठी मनाची तार छेडली. मराठी गझल गायनाच्या क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Swapnil S

मुंबई : राज्य सरकारतर्फे देण्यात येणारा ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर’ पुरस्कार गझल गायक भीमराव पांचाळे, चित्रपती कै. व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार (२०२४) ज्येष्ठ दिग्दर्शक महेश मांजरेकर, चित्रपती कै. व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री मुक्ता बर्वे, स्व. राजकपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर व स्व. राजकपूर विशेष योगदान पुरस्कार काजोल देवगण यांना मंगळवारी प्रदान करण्यात आला.

महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचा हीरकमहोत्सवी सोहळा मंगळवारी सायंकाळी वरळीच्या एनएससीआय डोम येथे आयोजित केला होता. यावेळी ६० आणि ६१ वे महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यावेळी उपस्थित होते.

गझल हा लोकप्रिय गानप्रकार सुफी संतांमुळे भारतात रुजला. गझल हेच व्रत म्हणून घेणारे भीमराव पांचाळे. ‘आयुष्य तेच आहे अन् हाच पेच आहे’, असे म्हणत त्यांनी मराठी मनाची तार छेडली. मराठी गझल गायनाच्या क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह आणि १० लाख रुपयाचा धनादेश देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

देवेंद्र फडणवीस यांनी मराठी चित्रपट सृष्टीतील तसेच मराठी चित्रपटाला योगदान देणाऱ्यांचे कौतुक केले. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी अनुपम खेर यांचेदेखील कौतुक केले. तसेच अनुपम खेर यांनी माझा डायलॉग चोरलेला आहे, ते म्हणाले 'मी पुन्हा येईन' याचा कॉपीराइट माझ्याकडे आहे, असे फडणवीस यांनी म्हणताच कार्यक्रमात एकच हशा पिकला. मुक्ता बर्वेंचीसुद्धा मुख्यमंत्र्यांनी दखल घेत तिच्या कामाचे कौतुक केले. त्यांचा मोनोलॉग हा अप्रतिम आहे, असे फडणवीस म्हणाले.

‘खालिद का शिवाजी’ चित्रपटावरून घोषणाबाजी

पुरस्कार प्रदान सोहळा कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण सुरू असतानाच काही जणांनी ‘खालिद का शिवाजी’ नामक चित्रपटाला विरोध करत घोषणाबाजी केली. ‘खालिद का शिवाजी’ हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये म्हणून ही घोषणाबाजी करण्यात आल्याचे समजते. घोषणाबाजी ऐकल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी, तुमचे म्हणणे मांडले आहे, कार्यक्रम खराब करू नका, असे आवाहन केले. त्यानंतर पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्यांना ताब्यात घेतले.

ठाकरेंना मागच्या रांगेत बसवल्यावरून खडाखडी

प्राप्तिकर विधेयक सरकारकडून मागे

...तोपर्यंत व्यापार चर्चा नाही! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला पुन्हा इशारा

मोदींच्या दौऱ्याचे चीनकडून स्वागत

तेल कंपन्यांना अनुदान, ‘टॅरिफ बॉम्ब’च्या पार्श्वभूमीवर ३० हजार कोटींची मदत; केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय