मनोरंजन

Rama Raghav: बिगबॉस फेम वीणा जगताप करणार ‘रमा राघव’च्या आयुष्यात एन्ट्री!

Veena Jagtap: रमा राघवचा सुरू झालेला वनवास आणि त्यात विक्रम या असुराचा प्रवेश या पार्श्वभूमीवर वीणाचे एक नवे पात्र मालिकेत प्रवेश करत आहे.

Tejashree Gaikwad

Marathi TV Serial Updates: कलर्स मराठीवरील ‘रमा राघव’ मालिका (Rama Raghav serial updates) खूप चर्चेत आहेत. मालिका सध्या अगदी उत्कंठावर्धक टप्प्यावर आहे. अशातच मालिकेत येणारे एक नवे वळण प्रेक्षकांमध्ये मोठा चर्चेचा विषय ठरत आहे. रमा राघवच्या पत्रिकेत असलेला विरह टळावा यासाठी पुरोहितांनी मनावर दगड ठेऊन रमा राघवला वनवासाला पाठवण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा वनवास रमा राघवच्या आयुष्यात नवे वादळ आणणारा ठरणार असून विक्रम या पात्राचा त्यांच्या आयुष्यात प्रवेश झाला आहे. हे पात्र अभिनेत्री वीणा जगताप साकारणार आहे.

वीणा जगताप एका वेगळ्या अंदाजात

आता या प्रसिद्ध मालिकेत लोकप्रिय अभिनेत्री वीणा जगताप एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांसमोर येत आहे. रमा राघवचा सुरू झालेला वनवास आणि त्यात विक्रम या असुराचा प्रवेश या पार्श्वभूमीवर वीणाचे एक नवे पात्र मालिकेत प्रवेश करत आहे.

प्रेक्षकांना सुखद धक्का

लोकप्रिय अभिनेता अद्वैत दादरकर पाठोपाठ वीणाचा या मालिकेतील प्रवेश प्रेक्षकांसाठी सुखद धक्का आहे. कलर्स मराठीवरील ‘राधा प्रेम रंगी रंगली’ या मालिकेतून वीणाने टेलिव्हिजनवर पदार्पण केलं होत. नंतर ती जास्त चर्चेत आली बिग बॉस या रियालटी शोमधून. या शो मधून ती लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. त्यानंतर पुन्हा एकदा वीणा कलर्स मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

वीणाची नक्की कोणती भूमिका आहे ? रमा राघवच्या आयुष्यावर त्याचा काय प्रभाव पडणार? हे गुलदस्त्यात असून त्याची उत्तरे ‘रमा राघव’मध्ये सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता कलर्स मराठीवर मिळणार आहेत.

GST परिषदेची आज बैठक; दैनंदिन वापरातील वस्तूंवरील कर कमी होण्याची शक्यता

विरार-अलिबाग अंतर दोन तासांत पार होणार; मल्टिमॉडेल मार्गिकेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

मराठा आंदोलनाचा विजय! अखेर मनोज जरांगे-पाटलांनी पाचव्या दिवशी उपोषण सोडले; राज्य सरकारकडून ८ पैकी ६ मागण्या मान्य

जंजिरा किल्ला सप्टेंबर अखेरपर्यंत खुला? पुरातत्त्व खात्याच्या हालचाली सुरू; असंख्य पर्यटकांची प्रतीक्षा लवकरच संपणार

स्वच्छतेसाठी आंदोलक सरसावले; आझाद मैदान परिसरात पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा पुढाकार