मनोरंजन

Bigg Boss Marathi 5: "मी विलन ठरली..." निक्कीला कॅप्टनसी पडली भारी

Nikki Tamboli, Abhijeet Sawant: अरबाजने निक्कीला वाढदिवसाची भेट म्हणून कॅप्टनसी दिली आहे. पण आता हीच कॅप्टनसी निक्कीला चांगलीच महागात पडली आहे.

Tejashree Gaikwad

Bigg Boss Marathi New Season Day 32 : 'बिग बॉस मराठी'चा पाचवा आठवडा सुरू असून या आठवड्याची कॅप्टन डोंबिवलीकर निक्की तांबोळी आहे. निक्की पहिल्या दिवसापासूनच 'बिग बॉस मराठी'च्या घरावर राज्य करताना दिसून येत आहे. अरबाजने निक्कीला वाढदिवसाची भेट म्हणून कॅप्टनसी दिली आहे. पण आता हीच कॅप्टनसी निक्कीला चांगलीच महागात पडली आहे.

बिग बॉस मराठीच्या आजच्या भागात निक्की आणि अभिजीत एकमेकांसोबत चर्चा करताना दिसत आहेत. अभिजीत निक्कीला म्हणतोय,"तू एकदम वाईट वागली आहेस..ज्याप्रकारे तू त्याला दुखावलं आहेस, अशी एक खोटी स्टोरी त्यांनी बनवली आहे". यावर निक्की म्हणते,"त्या स्टोरीमध्ये मी विलन ठरली आहे आणि तो हिरो ठरला आहे. पुरुषाचा राग कंट्रोल करण्याची पॉवर एका महिलेकडे आहे. पण त्याला आता असं वाटतंय की माझ्याकडे सगळं आहे आणि हिला आता दूर करा. १०० माणसांपेक्षा एक महिला सामर्थ्यवान आहे. पण त्याला हे १०० माणसं हवी आहेत. कॅप्टनसी मला खूप भारी पडली आहे. नॉमिनेटदेखील झाले आहे". त्यावर अभिजीत म्हणतो,"तुझ्यासोबत मलादेखील ही कॅप्टनसी भारी पडली आहे".

दुसरीकडे अरबाज, डीपी दादा, अंकिता, आर्या, वर्षा ताई, सूरज, घन:श्याम ही मंडळी निक्कीबद्दल चर्चा करताना दिसणार आहेत.

अरबाज म्हणतोय,"मी तिच्यासाठी खूप गोष्टी केल्या. त्यामुळे माझी चांगली इमेज वाईट कशी दिसेल यासाठी तिने प्रयत्न सुरू केले. पण मी मात्र लोकांसमोर तिला चुकीचं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे". यावर अरबाजला डीपी दादा म्हणतो,"वैभव, अरबाज आणि जान्हवी हे आता आपल्याला जवळ करणार नाहीत हे निक्कीला कळालं आहे. त्यामुळे माझ्या विचारसरणीनुसार तिचा प्लॅन हाच असेल की, मी आता हे कसं सिद्ध करू की मी किती प्रयत्न करत आहे".

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

सांगलीत खताच्या कारखान्यात वायू गळती; तीन ठार, ९ जण रुग्णालयात

Mumbai: धक्कादायक! लोकलमधील बसण्याच्या वादातून तरुणाचा खून

मच्छिमार नौकेची नौदलाच्या पाणबुडीला धडक; गोव्याच्या समुद्रातील घटना; नौदलाकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश