मनोरंजन

Bigg Boss Marathi 5: गोलीगत स्टाईलने सुरज झाला कॅप्टन, झापुक झुपूक डान्स करत केलं सेलिब्रेशन!

Tejashree Gaikwad

Bigg Boss Marathi Day 41: ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या आठवड्यात कोण कॅप्टन होणार आणि पुढच्या आठवड्याची इम्युनिटी कोणाला मिळणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. कॅप्टनसी टास्कमध्ये सूरज चव्हाण, वर्षा उसगांवकर, जान्हवी किल्लेकर आणि अंकिता वालावलकर हे चार सदस्य शेवटपर्यंत बसमध्ये टिकून राहिले होते. या चार सदस्यांमधून सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा नवा कॅप्टन ठरला आहे.

सूरज चव्हाणच्या झापुक झुपुकने जिंकलय सगळ्यांचं काळीज. त्यामुळे घरातील सर्व सदस्य एकमुखाने आमचा कॅप्टन म्हणजे सूरज असं म्हणताना दिसत आहेत. सूरज कॅप्टन झाल्यानंतर घरातील सर्व सदस्यांनी चांगलीच धमाल केली आहे. “हमारा कॅप्टन कैसा हो सूरज जैसा हो” अशी घोषणाबाजी करण्यात आली. तसेच सर्व सदस्यांनी मिळून सूरजबरोबर ‘झापुक झुपूक’ बोलत डान्स देखील केला.

'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनमध्ये आतापर्यंत अंकिता वालावलकर, अरबाज पटेल, निक्की तांबोळी, वर्षा उसगांवकर कॅप्टन झाले आहेत. तर आता सहाव्या आठवड्यात गोलीगत सूरज चव्हाणला कॅप्टन पदाचा मान मिळाला आहे. कॅप्टन रूमचा ताबा घेण्याआधी सूरजने हात जोडून नमस्कार केलेला पाहायला मिळाला. कॅप्टन सूरजचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.

राज्यात 'महिला राज'ची चर्चा; सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत

मुरबाडच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाचाही दावा; महाविकास आघाडीत रस्सीखेच वाढणार!

हिरे क्षेत्र गंभीर संकटात; गेल्या तीन वर्षांत आयात-निर्यातीत मोठी घट,'जीटीआरआय’चा दावा

नव्या सरकारच्या स्वागतासाठी मंत्रालयात स्वच्छता मोहीम

‘मला काहीतरी सांगायचंय’; मुख्यमंत्र्यांच्या जीवनावरील नाटक, लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला