मनोरंजन

Bigg Boss Marathi 5: "मला तू नॅचरली अट्रॅक्टीव्ह वाटतो..." बिग बॉस मराठी'च्या घरात रॅपर गर्ल कोणाच्या प्रेमात पडली?

QK, Arya Jadhao Rapper: क्यूके अर्थात रॅपर आर्या जाधव बिग बॉस मराठीच्या घरात प्रेमात पडल्याचं दिसून येत आहे.

Tejashree Gaikwad

Bigg Boss Marathi New Season Day 12 : 'बिग बॉस मराठी'च्या घरात सुरुवातीपासूनच प्रेमाचे वारे वाहू लागले आहेत. अरबाज आणि निक्कीची स्ट्राँग मैत्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात होऊ शकतं असा अंदाज नेटकऱ्यांनी बांधला. त्यानंतर रांगड्या मातीत परदेसी प्रेमाचं रोपटं फुललेलं दिसून आलं. बारामतीचा रांगडा गडी वैभव चव्हाण आणि इरिना रूडाकोवा यांच्यात लव्ह केमिस्ट्री फुलू शकते, असे म्हटले जाऊ लागले. अशातच आता रॅपर आर्यादेखील वैभवच्या प्रेमात पडल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे आर्याचा हार्टब्रेक होणार की वैभव तिचं प्रेम स्वीकारणार? हे येणारा काळच ठरवेल.

'बिग बॉस मराठी'चा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या प्रोमोमध्ये वैभव आणि इरिना मजा-मस्ती करताना दिसत आहेत. दरम्यान वैभव म्हणतो,"कसली क्यूट आहे यार ही". पण दुसरीकडे आर्या मात्र हार्टब्रेक झाल्याने ओक्साबोक्शी रडताना दिसत आहे. पुढे वैभव आर्याला विचारतो,"काय विषय आहे नक्की?". त्यावर आर्या म्हणते,"मला तू नॅचरली अट्रॅक्टीव्ह वाटतो". यावर वैभव म्हणतो,"मी तर तुला असं कोणतं इंटेंशन दिलेलं नाही". पण आर्या म्हणते,"मला होऊ शकतं अ‍ॅटरॅक्शन".

'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या आठवड्यात पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, सुरज चव्हाण, निखल दामले, निक्की तांबोळी आणि घन:श्याम दरवडे हे सहा सदस्य नॉमिनेट झाले आहेत. आता या सहा सदस्यांमधून या आठवड्यात कोण 'बिग बॉस मराठी'च्या घराचा निरोप घेणार हे पाहावे लागेल.

Maratha Reservation : मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी अखेर आझाद मैदानात; बेमुदत आंदोलनावर ठाम, पावसातही आंदोलकांचा उत्साह कायम

लातूर-नांदेडमध्ये मुसळधार पावसाचा कहर; बचावासाठी लष्कराची मदत, जनजीवन विस्कळीत

...तर मुख्यमंत्र्यांच्या कारकीर्दीला धोका! मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप; २९,९६५ गणेशमूर्तीच विसर्जन

...तर भारताचा 'टॅरिफ' कमी करू! व्हाइट हाऊसचे सल्लागार पीटर नवारो यांचे वक्तव्य