मनोरंजन

Bigg Boss Marathi 5: "ट्रॉफी मीच जिंकणार... शेवटी आलोय, शेवटी जाणार" सूरजने ठामपणेच सांगितलं

Suraj Chavan: सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा खेळ त्याच्या गोलीगत स्टाईलने खेळत आहे.

Tejashree Gaikwad

Bigg Boss Marathi New Season Day 17: टिक टॉकच्या पहिल्या दहात स्थान मिळवणारा स्टार अर्थात गोलीगत सूरज चव्हाण. महाराष्ट्रात सूरज चव्हाणचा मोठा चाहतावर्ग आहे. टिक टॉकचे रेकॉर्ड मोडणारा, अस्सल मराठी मातीतला स्टार सूरज चव्हाण आता 'बिग बॉस मराठी'चं घर गाजवतानाही दिसत आहे. 'बिग बॉस मराठी'चं घर, तिथले सदस्य, त्यांचं राहणीमान या सर्व गोष्टी सुरुवातीला सूरजसाठी खूप नव्या होत्या. त्यामुळे सुरुवातीचा एक आठवडा तो शांत होता. पण आता दुसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रभर त्याचा चांगलाच बोलबाला आहे.

सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा खेळ त्याच्या गोलीगत स्टाईलने खेळत आहे. आजच्या भागात सूरज चव्हाण अभिजीतला सांगताना दिसणार आहे की,"बिग बॉस मराठी'ची ट्रॉफी मीच नेणार". त्यावर अभिजीत त्याला म्हणतो,"तुझा हक्क आहे". सूरज म्हणतो,"बिग बॉस मराठी'च्या ट्रॉफीला मी कोणाला हात लावू देणार नाही". अभिजीत सूरजला म्हणतो,"शेवटून पहिला आहेस तू". त्यावर सूरज म्हणतो,"शेवटी आलो... शेवटीच जाणार". यावर अभिजीत म्हणतो,"तू जिंकलास तर आम्हालाही आनंद होईल".

गोलीगत सूरज चव्हाण त्याच्या स्टाईलने खेळून 'बिग बॉस मराठी'च्या प्रेक्षकांची मने जिंकत आहे. त्याचा खेळीचं सर्वत्र चांगलच कौतुक होत आहे.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक