मनोरंजन

Bigg Boss Marathi 5: गोलीगत आठवडा! भाऊच्या धक्क्यावर रितेशने केलं सूरज चव्हाणचं कौतुक

Suraj Chavan: पहिले दोन आठवडे शांत असणाऱ्या सूरजने तिसरा आठवड्यात कॅप्टनसी टास्कमध्ये चांगलाच धुमाकूळ घातला आहे. त्याची खेळी प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरली आहे.

Tejashree Gaikwad

Bigg Boss Marathi New Season: 'बिग बॉस मराठी'चा तिसरा आठवडा गोलीगत सूरज चव्हाणने चांगलाच गाजवला आहे. याबद्दल भाऊच्या धक्क्यावर रितेश सूरजचं भरभरून कौतुक करताना दिसणार आहे. सूरज कॅप्टन झालेला नसला तरी या आठवड्यात त्याने बाजी मारली आहे. पहिले दोन आठवडे शांत असणाऱ्या सूरजने तिसरा आठवड्यात कॅप्टनसी टास्कमध्ये चांगलाच धुमाकूळ घातला आहे. त्याची खेळी प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरली आहे.

भाऊच्या धक्क्यावर सूरजचं कौतुक करत रितेश म्हणतोय,"या आठवड्यात एका हिरोने जन्म घेतला. ज्याने मिळालेल्या संधीचं सोनं केलंय त्याचं नाव आहे सूरज चव्हाण. अख्ख घर म्हणतं त्याला गेम कळत नाही. पण या आठवड्यात फक्त सूरजचाच गेम दिसला. त्याने एकट्याने सगळ्यांना टफ फाईट दिली".

रितेश पुढे म्हणतो,"झुंड में भेडिये आते हैं शेर अकेला ही आता है... तीन आठवड्यात पहिल्यांदाच अरबाजच्या चेहऱ्यावर भीती दिसत होती. निक्की आणि जान्हवीदेखील घाबरलेल्या दिसून आल्या होत्या. कोणालाही कमी लेखू नये. हे या आठवड्यात सिद्ध झालं आहे. सूरजच्या खांद्यावर बंदूक ठेऊन कोणीही खेळू नका. सर्वांना समान न्याय मिळायला हवा. या घरातील सर्व सदस्य समान आहेत. सूरजने एकट्याने बाजी मारली आहे. त्याला कमी लेखू नका". तसेच यापुढे बिनधास्त खेळण्याचा सल्ला रितेश सूरजला देताना दिसणार आहे".

IIT मुंबईतील विद्यार्थ्याची आत्महत्या; परीक्षेत ChatGPT वापरल्याचा आरोप, प्रशासनाविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन

Ulhasnagar : धुक्याच्या आड रात्री ‘केमिकल गॅस’चा खेळ? उग्र वास अन् धुक्याची चादर; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Ganeshotsav 2026 : गणपतीच्या सजावटीत FDA ची झलक; तुकाराम मुंढेंच्या कामाला अनोख्या पद्धतीने सलाम, Video

Mumbai : ‘त्या’ फुटबॉल मैदानावर ‘एमएफए’चा अधिकार नाही; म्हाडाची उच्च न्यायालयात माहिती

Mumbai : पालिकेने SIR साठी मोजले १०.८१ कोटी रुपये; चार महिन्यांत १,३०४ डेटा एंट्री ऑपरेटरची नियुक्ती