मनोरंजन

बारामतीचा रांगडा गडी 'वैभव चव्हाण' Bigg Boss Marathiच्या घरातून बाहेर, संपला ५० दिवसांचा प्रवास

Vaibhav Chavan: या आठवड्यात आर्याला बिग बॉसच्या घरातून निष्कासित केले गेले. तर प्रेक्षकांच्या वोटिंगचा मान ठेवच वैभवला घर सोडावं लागलं.

Tejashree Gaikwad

Bigg Boss Marathi New Season: महाराष्ट्राच्या मातीतला बारामतीचा रांगडा गडी म्हणजेच अभिनेता वैभव चव्हाणचा 'बिग बॉस मराठी'च्या घरातील प्रवास संपला आहे. या आठवड्यात वैभवसह अभिजीत सावंत, वर्षा उसगांवकर, निक्की तांबोळी, अंकिता वालावलकर आणि आर्या हे सदस्य नॉमिनेट झाले होते. यात आर्याला बिग बॉसच्या घरातून निष्कासित केले गेले. तर प्रेक्षकांच्या वोटिंगचा मान ठेवच वैभवला घर सोडावं लागलं.

वैभव चव्हाणने आपल्या कातिल लूकने सर्वांनाच घायाळ केलं आहे. लढवैया, बिनधास्त आणि जिद्दी व्यक्तिमत्त्व असणारा वैभव 'बिग बॉस मराठी'चा खेळ खेळण्यात कुठेतरी कमी पडला. वैभव चव्हाण अशी ओळख मिळवण्यापेक्षा 'अरबाज २' अशी ओळख त्याने मिळवली. कधी गद्दारी केल्याने तर कधी रांगड्या मातीत परदेशी प्रेमाचं रोपटं लावल्याने तो चर्चेत होता. आता वैभव घराबाहेर पडल्याने त्याच्या चाहत्यांना मात्र मोठा धक्का बसला आहे.

हिरो होण्याची वैभवला अनेकदा संधी मिळाली होती. रितेश भाऊनेदेखील त्याला वारंवार सांगितलं होतं. पण मिळालेल्या संधीचं वैभव सोनं करू शकला नाही. 'बिग बॉस मराठी'चा खेळ वैभव चांगला खेळला. पण तो आणखी चांगला खेळू शकला असता. इनव्हेस्टमेंट बॉक्समध्ये असलेले ५० पॉईंट्सच्या दोन कॉइनचे नॉमिनी वैभवने जान्हवी आणि अरबाजला दिले.

बिग बॉस मराठीच्या घराचा निरोप घेतल्यानंतर वैभव चव्हाण म्हणाला,"तुम्ही दिलेले सल्ले मी फॉलो करायला हवे होते. पण मिळालेल्या संधीचं सोनं करता आलं नाही याचं मला खरचं खूप दु:ख आहे. आता बाहेर पडल्यानंतर मला जान्हवीची खूप आठवण येईल. तर अरबाजसोबतची लढाई अजून बाकी आहे. बाकी सदस्यांना उत्तम खेळण्यासाठी शुभेच्छा देतो".

मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश; म्हणाल्या - 'राजीव सातव यांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि देवाभाऊंच्या...

Ram Sutar Passes Away : भारतीय शिल्पकलेतील युगाचा अंत; ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चे शिल्पकार राम सुतार यांचे निधन

मीरा भाईंंदरच्या अंतिम मतदार यादीतही प्रचंड घोळ; अनेक मतदारांची नावे ठाणे महापालिकेत तर १६०० मतदारांची नावे घरापासून लांब

भारत आणि ओमान आज मस्कतमध्ये मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी करणार

ठाण्यात भाजप-शिवसेनेचं ठरलं! शिंदे सेना भाजपला जागा वाटपाचा नवा प्रस्ताव देणार