मनोरंजन

Sourav Ganguly : दादावर येणार बायोपिक; 'हा' अभिनेता साकारणार सौरव गांगुलीची भूमिका

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीवर (Sourav Ganguly) लवकरच एक बायोपिक येणार असून त्याच्यासाठी अभिनेत्याची निवड करण्यात आल्याची माहिती

प्रतिनिधी

भारतीय क्रिकेट संघाच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेला माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली (Sourav Ganguly) याच्या जीववनावर आधारित एक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये सौरव दादाची भूमिका रणबीर कपूर (Ranbir Kapoor) साकारणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गांगुलीने त्याच्या बायोपिकच्या कथेला मंजुरी दिली आहे. लवकरच या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये भारताचा आणखी एक माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचीही झलक दिसणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.

सचिन तेंडुलकर, कपिल देव, तसेच धोनीनंतर आता सौरव गांगुली उर्फ दादावरही बायोपिक येणार असल्याने क्रिकेटप्रेमींमध्ये एक उत्सुकता निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून याची चर्चा सुरु होती. सौरव गांगुलीने कर्णधार म्हणून भारतीय क्रिकेटच्या इतिहासामध्ये एक वेगळी छाप सोडली आहे. तसेच, फक्त एक यशस्वी कर्णधारच नव्हे तर तो एक चांगला फलंदाजही होता. त्याने भारतीय संघासाठी खेळताना अनेक सामने एकहाती जिंकून दिले आहेत.

सौरव गांगुलीने त्यांच्या कारकिर्दीत ४००हुन अधिक सामने खेळले असून १८ हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने ३८ शतके आणि १०७ अर्धशतके केली आहेत. कसोटी आणि एकदिवसीय अशा दोन्ही प्रकारात त्याची फलंदाजीची सरासरी ४१हून अधिक आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत १३२ विकेट्सही घेतल्या आहेत. तसेच, भारताचे नेतृत्व करताना त्याने एक कर्णधार म्हणून मोठे योगदान दिले आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी