मनोरंजन

राखी सावंत प्रकरणी मिका सिंगविरोधातील एफआयआर मुंबई हायकोर्टाकडून रद्द; १७ वर्षापासूनच्या वादावर पडदा

नवशक्ती Web Desk

मागील १७ वर्ष सिनेसृष्टीत चर्चेचा विषय ठरलेल्या राखी सावंत चुंबन प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. सुमारे १७ वर्षानंतर या वादावर पडदा पडला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात मिका सिंगला मोठा दिलासा दिला आहे. राखी सावंतचे १७ वर्षापूर्वी जबरदस्ती चुंबन घेल्याचा आरोप मिका सिंगवर होता. गेली १७ वर्षे या आरोपाला सामोरे गेलेल्या मिका सिंगविरोधातील एफआयआर रद्द करण्यास अभिनेत्री राखी सावंत हिनेही सहमती दर्शवली होती. ही एफआयआर रद्द करण्यास राखी सावंत तयार झाल्यानंतर आज न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने गुन्हा रद्द करण्याचा महत्वपूर्ण निर्णय देत मिका सिंगला आरोपमुक्त केले आहे.

२००६ साली ओशिवरा पोलीस ठाण्यात मिका सिंगविरोधात राखी सावंतने गुन्हा दाखल केला होता. ही तक्रार रद्द करण्यासाठी मिका सिंगने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. राखी सावंतने मिका सिंगवर बळजबरी किस केल्याचा आरोप केला होता. मिका सिंगच्या वकिलाच्या सांगण्यानुसार गायकाने आणि राखीने हे प्रकरण सामंजस्याने मिटवले असल्याने हे प्रकरण कोर्टातून रद्द करण्यात आलं आहे.

अभिनेत्री राखी सावंतला वाढदिवसाच्या पार्टीत मिका सिंगने तिच्या संमतीशिवाय सर्वांसमोर किस केले होते. १० एप्रिल रोजी हे प्रकरण न्यायमूर्ती एएस गडकरी यांच्या खंडपीठासमोर आले. यावेळी राखी सावंतचे वकील आयुष पासबोला यांनी न्यायालयाला सांगितले की, राखी तिच्या कामात व्यग्र आहे. मात्र दोघांनी वाद मिटवला आहे. त्यामुळे राखीने दाखल केलेला एफआयआर रद्द करण्यास हरकत नाही. यानंतर १७ वर्षापासून सुरु असलेल्या या वादावर पडदा पडला आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस