मनोरंजन

Boyz 4 Box Office Collection:'बॉईज 4'ची १० दिवसांची बॉक्स ऑफीसची कमाई केली जाहीर ;प्रेक्षकांच्या मनांत केलं घर...

मागील दहा दिवसातला 'बॉईज 4' या चित्रपटाचा बॉक्स ऑफीसचा रिपोर्ट समोर आला आहे

नवशक्ती Web Desk

'बॉईज 4' हा चित्रपट काही दिवसांपुर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाची चाहतेवर्ग उत्सुकतेने वाट पाहत होते. मागील दहा दिवसातला 'बॉईज 4' या चित्रपटाचा बॉक्स ऑफीसचा रिपोर्ट समोर आला आहे. बॉईज येणार तर बॉक्स ऑफिसवर पण राडा होणार! सुपरहिट 'Boyz4'ची धमाकेदार कमाई.. असं कॅप्शन देऊन 'बॉईज 4' चा बॉक्स ऑफीस रिपोर्ट जाहीर केला आहे. गेल्या १० दिवसात 'बॉईज 4'ने तब्बल ४.२० कोटीची कमाई केली आहे. बॉक्स ऑफीसवरील कमाई बघता 'बॉईज 4' या चित्रपटानं प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.

'बॉईज ४' हा चित्रपट काही दिवसांपुर्वी चित्रपटगृहात रिलिज झाला होता. या चित्रपटांत सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतिक लाड यांच्यासोबत 'बॅाईज ४' मध्ये आता ऋतिका श्रोत्री, अभिनय बेर्डे, निखील बने, गौरव मोरे, रितुजा शिंदे, जुई बेंडखळे हे कलाकार देखील दिसणार आहेत. याव्यतिरिक्त या चित्रपटात गिरीष कुलकर्णी, यतीन कार्येकर, समीर धर्माधिकारी आणि ओम पाटील यांच्या देखील प्रमुख भूमिका आहेत.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत