मनोरंजन

'वेड'चा रेकॉर्ड मोडून 'बाईपण भारी देवा' बनला मराठीतला सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट

या सिनेमाने बॉलीवूडला देखील मागे टाकले असून या मराठी चित्रपटासमोर आता हिंदी चित्रपट देखील चीतपट झाले आहेत

नवशक्ती Web Desk

लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या 'बाईपण भारी देवा' या सिनेमाने चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घातला आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर फक्त 'बाईपण भारी देवा' या चित्रपटाचीचं हवा आहे. जिथे पाहावं तिथे फक्त याच चित्रपटाची चर्चा आहे. या सिनेमाने आता बॉलीवूडला देखील मागे टाकले आहे. मराठी चित्रपटासमोर आता हिंदी चित्रपट देखील चीतपट झाले आहेत.

या चित्रपटाने आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची कमाई केली असून कमाईच्या बाबतींत या सिनेमाने लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुख याच्या 'वेड' या चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला आहे. सोबतच हा चित्रपट कमाईच्या बाबतीच मराठी चित्रपटसृष्टीतला सर्वाधिक कमाई करणारा २ चित्रपट ठरला आहे. आता काही दिवसात हा 'सैराट' या चित्रपटाचा रेकॉर्ड मोडणार का..? असा प्रश्न प्रेक्षकांना पडलाय.

'बाईपण भारी देवा' नंतर अनेक हिंदी सिनेमे प्रदर्शित झाले. मात्र कुणीही या चित्रपटासमोर टिकले आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाला देखील आपल्या मराठी चित्रपटाने धूळ चारली आहे. सहा बहिणीची कथा असलेल्या या सिनेमाने पहिल्या आठवड्यातच १२ कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या आठवड्यात ही कमाई वाढून तब्बल २४ कोटींवर गेली होती. आता तिसऱ्या आठवड्यात पुन्हा या चित्रपटाने २१ कोटी आणि चौथ्या आठवड्यात १० कोटींची कमाई केली. तसंच पुढच्या आठवड्यात मिळून ही कमाई चक्क ८३ कोटी ५० लाखांवर पोहोचली असून ही कमाई आंतरराष्ट्रीय स्तरावरील कमाई आहे. 'वेड' या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळून ७५ कोटींची कमाई केली होती.

'बाईपण भारी देवा' या चित्रपटाने भारतामध्ये तब्बल ७२ कोटी ११ लाखांची कमाई केली आहे. सैराट या चित्रपटाने देशभर ११० कोटींची कमाई केली होती. आता हा आकडा 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट गाठू शकणार का..? या कडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे. कोणी काय ही बोलो पण फक्त ५ कोटींमध्ये बनलेला हा चित्रपट सगळ्यांवर बारी पडला आहे एवढं मात्र खरं.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

‘बटेंगे तो कटेंगे’, ओबीसीने भाजपला तारले