मनोरंजन

कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक

बुधवारी रात्री उशिरापासून त्यांना वारंवार झटके येत आहेत. डॉक्टरांनी त्यांच्या डोक्याचे सीटी स्कॅन केले

वृत्तसंस्था

गेल्या नऊ दिवसांपासून गंभीर आजारी असलेल्या कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या मेंदूने काम करणे बंद केले आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती अधिकच चिंताजनक बनली आहे. कोलकत्याहून न्यूरोलॉजिस्ट डॉ. पद्मा श्रीवास्तव यांना दिल्लीला बोलावले आहे. कुटुंबाला आता चमत्काराची अपेक्षा आहे. 

बुधवारी रात्री उशिरापासून त्यांना वारंवार झटके येत आहेत. डॉक्टरांनी त्यांच्या डोक्याचे सीटी स्कॅन केले तेव्हा मेंदूच्या एका भागात सूज दिसून आली आहे. त्यांचे मोठे भाऊ सी.पी. श्रीवास्तव यांनी सांगितल्यानुसार, त्यांच्या मेंदूला सूज आल्याने पाणी आढळले आहे. कुटुंबातील सदस्य आणि अनेक नातेवाईक दिल्ली एम्समध्ये पोहोचले आहेत.दुसरीकडे राजू श्रीवास्तव यांच्यासाठी औषधोपचारांसह देवाला साकडे घातले जात आहेत. काशी विश्वनाथ धाम आणि उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात महामृत्यूंजर मंत्राचा जप केला.

Mumbai : ठाकरे बंधूंची आज दादरमध्ये विजयी सभा; तरुणांनी भीती घालवली - उद्धव ठाकरे

Mumbai : जन्म दाखल्यासाठी सॉफ्टवेअर आणणार; मानखुर्द, कुर्ल्यातील दाखल्यांचा तत्काळ निपटारा करा, अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश

फडणवीस अचानक दिल्लीला, चर्चांना उधाण; भेटीगाठींबाबत गुप्तता, काही तासांनंतर नागपुरात परत

महाराष्ट्र टीईटी पेपरफुटी प्रकरण : TET पेपरफुटीचा सूत्रधार अटकेत

Shahapur : भातसा वाहू लागले; मुंबईकरांची चिंता मिटली