स्टॅण्डअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी विरोधात तक्रार;'हफ्ता वसुली' बंद करण्याची मागणी; काय आहे प्रकरण? X-@SachdevaAmita
मनोरंजन

स्टॅण्डअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीविरोधात तक्रार;'हफ्ता वसुली' बंद करण्याची मागणी; काय आहे प्रकरण?

समय रैना, रणवीर अलाहबादियानंतर आता स्टॅण्डअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui) याच्याविरोधात तक्रार देण्यात आली आहे. तसेच 'जिओ हॉटस्टार' (JioHotstar) या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील त्याचा शो 'हफ्ता वसुली'ला (Hafta Wasooli) बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. ॲडव्होकेट अमिता सचदेव (Amita Sachdeva, Advocate) यांनी दिल्ली पोलिसांकडे इ मेलद्वारे तक्रार दिली आहे.

Kkhushi Niramish

समय रैना, रणवीर अलाहबादियानंतर आता स्टॅण्डअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui) याच्याविरोधात तक्रार देण्यात आली आहे. तसेच 'जिओ हॉटस्टार' (JioHotstar) या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील त्याचा शो 'हफ्ता वसुली'ला (Hafta Wasooli) बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. ॲडव्होकेट अमिता सचदेव (Amita Sachdeva, Advocate) यांनी दिल्ली पोलिसांकडे इ मेलद्वारे तक्रार दिली आहे. तक्रारीत मुनव्वर फारुकी याच्यावर वेगवेगळ्या धर्मांचा अपमान करणे आणि अश्लिलता प्रसारित करण्याचे आरोप करण्यात आले आहेत. जाणून घ्या काय आहे हे प्रकरण..

स्टॅण्डअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीचा ओटीटी प्लॅटफॉर्म 'जिओ हॉटस्टार'वर 'हफ्ता वसुली' हा शो स्ट्रिम करण्यात येत आहे. ॲडव्होकेट अमिता सचदेव यांनी या शो आणि मुनव्वर फारुकी विरोधात दिल्ली पोलिसांना इ मेल द्वारे तक्रार दिली आहे. याची माहिती त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवर दिली आहे.

त्यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे, या शो मध्ये वेगवेगळ्या धर्मांचा अपमान करणे, सांस्कृतिक मूल्यांचे उल्लंघन करणे, अश्लीलतेला प्रोत्साहन देणारा कंटेंट दाखवण्यात येत आहे. त्यांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १९६, २९९, आणि ३५३ सहित आयटी ॲक्ट अंतर्गत FIR दाखल करण्याची विनंती केली आहे. तसेच त्यांनी याची सोमवारी प्रत्यक्ष लेखी तक्रार देणार असून स्पीड पोस्टने देखील तक्रार पाठवणार असल्याचे म्हटले आहे. याशिवाय त्यांनी तक्रारीची दखल न घेतल्यास न्यायालयात जाण्याचे देखील म्हटले आहे.

ॲडव्होकेट अमिता सचदेव यांच्याव्यतिरिक्त 'हिंदू जनजागृती समिती'ने देखील सोशल मीडिया पोस्टकरून 'जिओ हॉटस्टार'वरील 'हफ्ता वसुली' हा शो तातडीने 'बॅन' करण्याची मागणी केली आहे. यामध्ये त्यांनी मुनव्वर फारुकी याने त्याच्या शो मध्ये अभद्र भाषा वापरल्याचा आरोप केला आहे. जी सार्वजनिकपणे पाहणे अस्वीकार्य आहे. यामुळे, नैतिक मुल्यांचे पतन होत आहे. तसेच स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मने जबाबदारीने वागावे, असे म्हटले आहे.

दरम्यान, या तक्रारीनंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याविषयी वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी या तक्रारीचे समर्थन केले आहे.

कोण आहे मुनव्वर फारुकी?

मुनव्वर फारुकी हा स्टॅण्डअप कॉमेडियन आहे. तो रिॲलिटी शो बिग बॉस १७ चा विजेता आहे. मुन्नवर फारुकी विरोधात तक्रार दाखल होण्याचे हे पहिले प्रकरण नाही. यापूर्वी देखील तो अनेक वेळा वादाच्या भोवऱ्यात अडकला असून त्याच्या विरोधात तक्रारी करण्यात आल्या होत्या. दरम्यान, 'हफ्ता वसुली'च्या शो मधील कंटेंटमुळे त्याच्या विरोधात देण्यात आलेल्या तक्रारीसंदर्भात त्याने अद्याप काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

यापूर्वी समय रैना याच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' शोमध्ये प्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाहबादियाने वापरलेल्या अश्लील भाषेमुळे सोशल मीडियातून याच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया देण्यात आल्या होत्या. तसेच या विरोधातील तक्रारी आणि FIR नंतर या शो चे सर्व भाग युट्यूबवरून काढून टाकण्यात आले होते. हे प्रकरण शांत होत नाही तोच आता पुन्हा कॉमेडियन मुनव्वर फारुकी याच्याविरोधात तक्रार देण्यात आली आहे.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक

घरांच्या किमती वाढल्याची राज्य सरकारची कबुली