मनोरंजन

उत्तम कथा असूनही 'घूमर'ची कामगिरी निराशाजनक ; पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर

'घूमर' ला आधीच सुपरहीट ठरलेल्या 'गदर २' आणि 'OMG 2' दोन चित्रपटांशी स्पर्धा करावी लागत आहे.

नवशक्ती Web Desk

अभिषेक बच्चन आणि सैयामी खेर यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'घूमर' चित्रपट काल (१८ ऑगस्ट) रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाची गेले काही दिवस खूप चर्चा रंगली होती. 'घूमर' चे कलाकार चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करताना दिसत होते. काल प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.

बॉक्स ऑफिसवर सध्या 'गदर २' चा जलवा पाहायला मिळत असून त्यासोबतच 'ओएमजी २' हा चित्रपट देखील चांगली कामगिरी करताना दिसत आहे. अशात 'घूमर' रिलिज झाला आहे. 'घूमर' ला आधीच सुपरहीट ठरलेल्या दोन चित्रपटांशी स्पर्धा करावी लागत आहे. अभिषेक बच्चनच्या 'घूमर' या चित्रपटाला रिव्ह्यू मिळून देखील तो सनी देओलच्या 'गदर २' समोर काही टिकू शकला नाही. चांगली कथा असून देखील 'घूमर'ला चित्रपटगृहांमध्ये अपेक्षित प्रेक्षक मिळताना दिसत नाही.

'घूमर' च्या पहिल्या दिवसाची आकडेवारी समोर आली आहे. 'सॅकनिल्क' ने दिलेल्या सुरुवातीच्या आकडेवारीनुसार या चित्रपटाने फक्त ८५ लाखांची कमाई केली आहे. हा चित्रपट क्रिकेटवर आधारित आहे. मागील काही दिवस या चित्रपटाची चांगली चर्चा रंगली होती, मात्र पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे बघून चित्रपटाने फारच निराशाजनक कामगिरी केली आहे.

हरिनामाच्या गजराने विठ्ठलाची पंढरी दुमदुमली! पंढरीत १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी; आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा !

महागड्या शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध; सुप्रिया सुळे यांचे ठाम प्रतिपादन

आवाज मराठीचाच! उद्धव-राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच मंचावर; राज्यभरातील मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण

डोममध्ये रंगला झिम्मा; शर्मिला ठाकरे, सुषमा अंधारे यांची फुगडी

देशात गरीबांची संख्या वाढणे ही चिंता वाढवणारी बाब; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन