'धुरंधर २' मोडणार 'पुष्पा २'चा विक्रम; चित्रपटाने २५ दिवसांत कमावले १७१२ कोटी; परदेशातील कमाई ४१५ कोटींची 
मनोरंजन

'धुरंधर २' मोडणार 'पुष्पा २'चा विक्रम; चित्रपटाने २५ दिवसांत कमावले १७१२ कोटी; परदेशातील कमाई ४१५ कोटींची

रणवीर सिंग अभिनित 'धुरंधर द रिवेंज' हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत आहे. चित्रपटाला प्रदर्शित होऊन २६ दिवस झाले असून चौथ्या आठवड्यानंतरही त्याची कमाई वाढतच जात आहे.

Swapnil S

मुंबई : रणवीर सिंग अभिनित 'धुरंधर द रिवेंज' हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत आहे. चित्रपटाला प्रदर्शित होऊन २६ दिवस झाले असून चौथ्या आठवड्यानंतरही त्याची कमाई वाढतच जात आहे.

सॅकनिल्कनुसार, हा चित्रपट आता अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २ : द रूल' च्या जगभरातील कमाईचा विक्रम मोडण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे. २५व्या दिवसापर्यंत धुरंधर २ चे जगभरातील एकूण कलेक्शन १,७१२.९८ कोटी रुपये झाले आहे.

पुष्पा २ चे लाइफटाइम जगभरातील कलेक्शन १,७४२.१० कोटी रुपये आहे. हा विक्रम मोडण्यासाठी चित्रपटाला आता ३० कोटींपेक्षा कमी रकमेची गरज आहे. तिकीट विक्रीच्या बाबतीत 'धुरंधर २' सध्या 'पुष्पा २' पेक्षा मागे आहे. ‘बुक मायशो’च्या आकडेवारीनुसार, ‘धुरंधर २’ची आतापर्यंत १.७१ कोटी तिकिटे विकली गेली आहेत, तर पुष्पा २ ची १.९२ कोटी तिकिटे विकली गेली होती.

भारतातील कमाईबद्दल बोलायचे झाल्यास, पुष्पा २ ने १,२३४.१० कोटी रुपयांचे निव्वळ कलेक्शन केले होते. ‘धुरंधर २’ ने आतापर्यंत फक्त १,०८३. कोटी रुपये कमावले आहेत. म्हणजेच, देशांतर्गत बाजारात चित्रपट अजूनही १५०.४३ कोटी रुपये मागे आहे.

आजचे राशिभविष्य, २६ ऑगस्ट २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

हेल्दी खायचंय? मखाना, मिलेट्ससह 'हे' पौष्टिक पर्याय जाणून घ्या

Rakshabandhan 2026 : नेहमीच्या भेटवस्तूंपेक्षा काहीतरी वेगळं; यंदा बहिणीला द्या फायनान्शियल सिक्युरिटी! पाहा सोपे पर्याय

केळी, दूध अन् गुळापासून बनवा टेस्टी खीर; वाचा झटपट रेसिपी

गूळ, मध की साखर? आरोग्यासाठी नेमका कोणता पर्याय चांगला? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत