Tiger Shroff Firing : गोळीबारानंतर टायगर श्रॉफच्या सुरक्षेत वाढ; मुंबई पोलिसांकडून बॉडीगार्ड्स तैनात, हल्ल्याचा तपास सुरू

टायगर श्रॉफच्या मनात भीती निर्माण करून त्याच्याकडून खंडणी उकळण्याचा हल्लेखोरांचा हेतू असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
Tiger Shroff Firing : गोळीबारानंतर टायगर श्रॉफच्या सुरक्षेत वाढ; मुंबई पोलिसांकडून बॉडीगार्ड्स तैनात, हल्ल्याचा तपास सुरू
Tiger Shroff Firing : गोळीबारानंतर टायगर श्रॉफच्या सुरक्षेत वाढ; मुंबई पोलिसांकडून बॉडीगार्ड्स तैनात, हल्ल्याचा तपास सुरू
Published on: 

मुंबईतील जुहू परिसरात बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार झाल्याच्या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी त्याच्या सुरक्षेत वाढ केली आहे. पोलिसांच्या संरक्षण शाखेकडून बॉडीगार्ड्स तैनात करण्यात आले असून, स्थानिक पोलिसांकडूनही अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राजस्थानमधील कोटा रेल्वे स्थानकावर या प्रकरणातील तीन संशयितांना सोमवारी (दि. १९) ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, या हल्ल्यामागे लॉरेन्स बिश्नोई टोळीचा संबंध आहे का आणि खंडणी उकळण्याचा हेतू होता का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

'आयएएनएस' च्या माहितीनुसार, गोळीबाराच्या घटनेपूर्वी टायगर श्रॉफला विशेष सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आलेली नव्हती. त्यामुळे तो हल्लेखोरांसाठी सहज लक्ष्य ठरला असावा, असा पोलिसांचा संशय आहे. मात्र, त्याला नेमक्या कोणत्या श्रेणीतील सुरक्षा पुरवण्यात आली आहे, याबाबत अधिकाऱ्यांनी अद्याप स्पष्ट माहिती दिलेली नाही.

Tiger Shroff Firing : गोळीबारानंतर टायगर श्रॉफच्या सुरक्षेत वाढ; मुंबई पोलिसांकडून बॉडीगार्ड्स तैनात, हल्ल्याचा तपास सुरू
Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्या तिघांना अटक; मुंबई पोलिसांनी राजस्थानच्या कोटामधून घातल्या बेड्या

प्राथमिक तपासात, टायगर श्रॉफच्या मनात भीती निर्माण करून त्याच्याकडून खंडणी उकळण्याचा हल्लेखोरांचा हेतू असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. बिश्नोई टोळीच्या यापूर्वीच्या गुन्हेगारी कारवायांचा संदर्भही तपासात विचारात घेतला जात आहे. मात्र, गोळीबारामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

कोटा रेल्वे स्थानकावर तिघांना अटक

टायगर श्रॉफच्या कारवर कथितरीत्या गोळीबार करणाऱ्या तिघांना सोमवारी (दि. १९) सकाळी राजस्थानमधील कोटा रेल्वे स्थानकावर रेल्वेतून ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी अवघ्या १५ मिनिटांत ही कारवाई केली. हे आरोपी मुंबईतून नेपाळच्या दिशेने पळून जाण्याच्या प्रयत्नात असावेत, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

Tiger Shroff Firing : गोळीबारानंतर टायगर श्रॉफच्या सुरक्षेत वाढ; मुंबई पोलिसांकडून बॉडीगार्ड्स तैनात, हल्ल्याचा तपास सुरू
Mumbai : टार्गेट टायगर श्रॉफ; कारवर गोळीबार, बिश्नोई टोळीने जबाबदारी स्वीकारल्याचा दावा

अटक करण्यात आलेल्यांमध्ये बिहारमधील बेगुसराय येथील ऋतिक ऊर्फ रोशन आणि हरयाणातील सोनीपत येथील रेहान यांचा समावेश आहे. कोटाच्या पोलिस अधीक्षक तेजस्वनी गौतम यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेस सकाळी १० वाजून १७ मिनिटांनी कोटा स्थानकावर पोहोचली असता, रेल्वेच्या जनरल डब्यातून या तिघांना ताब्यात घेण्यात आले.

गोळीबाराचा व्हिडीओ व्हायरल

मुंबईतील जुहू परिसरातील एका फुटबॉल क्लबमधून टायगर श्रॉफ कारने बाहेर पडत असताना गोळीबाराची घटना घडली होती. हल्लेखोरांनी अभिनेत्याच्या कारवर अगदी जवळून गोळ्या झाडल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

या घटनेत ३६ वर्षीय टायगर श्रॉफला गंभीर दुखापत झाली नसल्याचे वृत्त आहे. मात्र, त्याचा चालक आणि घटनास्थळी उपस्थित असलेली आणखी एक व्यक्ती जखमी झाली. या हल्ल्यामागील नेमका हेतू आणि बिश्नोई टोळीशी असलेला संभाव्य संबंध याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in