Photo : Instagram (Emma Watson)
मनोरंजन

'हॅरी पॉटर'फेम एमा वॉटसनवर ६ महिने गाडी चालवण्यास बंदी; लाखोंचा दंडही ठोठावला

‘हॅरी पॉटर’ सिरिजमध्ये हरमायनी ग्रेंजरची भूमिका साकारणारी एमा वॉटसन सध्या चर्चेत आली आहे. पण यावेळी कोणत्याही नव्या चित्रपटामुळे नाही, तर...

Mayuri Gawade

‘हॅरी पॉटर’ फ्रँचायझीमध्ये हरमायनी ग्रेंजरची भूमिका साकारणारी एमा वॉटसन सध्या चर्चेत आली आहे. पण यावेळी कोणत्याही नव्या चित्रपटामुळे नाही, तर तिच्या भरधाव वेगाने गाडी चालवण्याच्या चुकीमुळे. इंग्लंडमधील वायकोम्ब कोर्टाने नुकतेच तिला ६ महिन्यांसाठी गाडी चालवण्यास बंदी घातली आहे आणि सुमारे १.२० लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

बीबीसीच्या रिपोर्टनुसार, ३० किमी वेगमर्यादा असलेल्या परिसरात एमा ३८ किमी वेगाने गाडी चालवत होती. जुलै २०२४ मध्ये तिने हे वेगमर्यादेचे उल्लंघन केले होते. त्यावेळी तिच्या लायसन्सवर आधीच ९ पेनल्टी पॉइंट जमा झालेले होते. त्यामुळे आता नियमांनुसार तिला “ड्रायव्हिंगसाठी अपात्र” घोषित करण्यात आलं.

पाच मिनिटाच्या सुनावणीदरम्यान एमा स्वतः गैरहजर

१६ जुलै रोजी इंग्लंडमधील कोर्टात झालेल्या पाच मिनिटांच्या सुनावणीत एमा स्वतः उपस्थित नव्हती, पण तिच्या अनुपस्थितीतच हा निर्णय देण्यात आला. तिच्यावर १,०४४ पाउंड म्हणजे सुमारे १.२० लाख रुपयांचा आर्थिक दंडही आकारण्यात आला आहे. एमा वॉटसनने या निर्णयावर अजूनतरी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

'हॅरी पॉटर'चं रीबूट वर्जन

दरम्यान, ‘हॅरी पॉटर’ चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. HBO तर्फे या फ्रँचायजीचं रीबूट वर्जन तयार करण्यात येत आहे. डॉमिनिक मॅक्लॉघलिन या नव्या अभिनेत्याची सेटवरील झलक अलीकडेच समोर आली आहे. त्यामुळे एकीकडे एमा अडचणीत असली, तरी 'हॅरी पॉटर'चं जग पुन्हा एकदा नव्यानं उभं राहतंय.

काँग्रेसमधील काही नेत्यांच्या खुर्च्या धोक्यात येण्याची शक्यता; जनसुरक्षा विधेयक मंजूर झाल्याने नाराजी

बाबर क्रूर, अकबर सहिष्णू, तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा’; NCERT ने पुस्तकात केले मोठे बदल

२० कोटींच्या १४ शौचालयांच्या प्रकल्पाला स्थगिती; शहरातील अतिरिक्त आयुक्त दोषी आढळल्यास कारवाई करणार - राहुल नार्वेकर

तेल वाहतूक कंत्राटांत एससी, एसटी आरक्षण बंधनकारक; केंद्राचा निर्णय हायकोर्टाने कायम ठेवला

त्रिभाषा सूत्र लागू करणारच! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णयावर ठाम