मनोरंजन

Dunky Release: रिलीजआधीच 'डंकी'च्या जगभरातील चाहत्यांमध्ये उत्साह

जगभरात या चित्रपटाचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरु झाले असून आतापर्यंत या चित्रपटाचे जगभरात 5500 तिकिट विकले गेले असल्याची माहिती आहे.

Swapnil S

बॉलीवूडचा किंग शाहरुख खानचा 'डंकी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. 'पठाण' आणि 'जवान'च्या यशानंतर आता 'डंकी' हा चित्रपट बॉक्स ऑफिवर किती मजल मारतो, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून किंग खान रुपेरी पडदा पुन्हा एकदा गाजवणार आहे. 'डंकी' या चित्रपटाच्या रिलीजआधीच जगभरात चाहत्यांचा उत्साह पाहायला मिळत आहे.

'डंकी' या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने राजकुमार हिरानी आणि शाहरुख पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. राजकुमार हिरानी यांचे 'मुन्नाभाई एमबीबीएस', '3 इडियट्स' आणि 'पीके', असे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. त्यामुळे आता 'डंकी' या चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा असल्याचं दिसून येत आहे.

'डंकी'चा फर्स्ट डे फर्स्ट शो भारतातील एकूण 240 शहरांमध्ये होणार आहे. तर विदेशातील 50 ठिकाणी या चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो होणार आहे. वीकेंडला हा आकडा 750 च्या आसपास असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शाहरुख खानच्या फॅनक्लबने फर्स्ट डे फर्स्ट शो संदर्भात ट्वीट केले आहे. हा चित्रपट 21 डिसेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात शाहरुख खान, तापसी पन्नू, विकी कौशल, बोमन ईरानी आणि विक्रम कोचर यांच्या महत्त्वाच्या भूमिका असतील. 'पठाण' आणि 'जवान'पेक्षा 'डंकी' या चित्रपटाचे सर्वाधिक शो ठेवण्यात आले आहेत. जगभरात या चित्रपटाचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग देखील सुरु झाले आहे. आतापर्यंत या चित्रपटाचे जगभरात 5500 तिकिट विकले गेले असल्याची माहिती आहे.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री

गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता: जुळ्या बोगद्यांच्या बांधणीचा मार्ग मोकळा