मनोरंजन

'सिनेमा मरते दम तक'च्या स्पेशल स्क्रिनिंगला सिनेतारकांनी लावली हजेरी

वृत्तसंस्था

अ‍ॅमेझॉन ओरिजनल रिअ‍ॅलिटी डॉक्यू-सिरीज 'सिनेमा मरते दम तक' प्रेक्षकांना पडद्यामागील ९०च्या दशकातील हिंदी पल्प मूव्हीजच्या आकर्षक आणि अप्रत्याशित जगात घेऊन जाते. एक गोल्डन-एरा ज्याने कल्ट फेनोमेनाचा फॅनबेस वाढवला. अलीकडेच, प्राइम व्हिडीओ, वसन बाला आणि व्हाइस मीडियाने सिनेसृष्टीतील मित्र आणि मीडिया सदस्यांना एकत्र आणून लव्ह फॉर सिनेमा साजरे करण्यासाठी या रिअ‍ॅलिटी डॉक्यू-सिरीजच्या विशेष स्क्रिनिंगचे आयोजन केले.

यादरम्यान, 'सिनेमा मरते दम तक'ची टीम पूर्ण जोशमध्ये दिसली आणि प्रेक्षकांचे कौतुक, टाळ्या आणि प्रेम पाहून भारावून गेली. या स्पेशल स्क्रिनिंगमध्ये हेड ऑफ इंडिया ओरिजनल्स, प्राइम व्हिडीओ अपर्णा पुरोहित, वसन बाला, आणि समीरा कंवरसह विनोद तलवार, शिवा रिंदानी आणि हरीश पटेल यांसारखे ९०च्या दशकातील पल्प इंडस्ट्रीतील क्रिएटर्स आणि टॅलेंट उपस्थित होते. तसेच, इंडस्ट्रीमधून सिकंदर खेर, हुमा कुरेशी, आकांशा रंजन कपूर, राधिका मदान, आरती कदव, कनन गिल, सुमुखी सुरेश, साहिल शाह, कनीज सुरका, सुमैरा शेख, आणि रिताशा राठौर हे कलाकारही या कार्यक्रमाचा भाग होते.

व्हाइस स्टुडिओज प्रॉडक्शनद्वारा प्रोड्यूस केलेली आणि उत्कृष्ट फिल्ममेकर वसन बालाद्वारा निर्मित, सहा भागांची असेलेल्या या रिअ‍ॅलिटी डॉक्यूमेंट्री-सिरीजमध्ये पहिल्यांदा ९०च्या दशकातील पल्प सिनेमा इंडस्ट्रीतील ग्लिझ आणि इंडिपेंडेंट इकोसिस्टमची झलक दाखवण्यात आली आहे. तसेच, दिशा रिंदानी, झुल्फी आणि कुलिश कांत ठाकूर यांनी सह-दिग्दर्शित केलेली 'सिनेमा मरते दम तक'ही सिरीज त्या काळातील चार विलक्षण दिग्दर्शक - जे नीलम, विनोद तलवार, दिलीप गुलाटी आणि किशन शाह यांच्यासोबत प्रेक्षकांना पडद्यामागे घेऊन जाते. जेव्हा ते आपल्या स्वान गाण्यांसाठी पुन्हा येतात, तेव्हा ३० वर्षांपूर्वीचे समान बजेट आणि थीम वापरून चित्रपट बनवतात.

तसेच, 'सिनेमा मरते दम तक या सिरीजमध्ये रझा मुराद, मुकेश ऋषी, हरीश पटेल आणि राखी सावंत या कलाकारांना पाहायला मिळणार असून, ते भारतीय सिनेमाच्या अशा पैलूंवर आपले विचार व्यक्त करतील ज्याबद्दल दर्शकांना फार कमी माहित आहे. अभिनेता अर्जुन कपूरला देखील शेवटच्या एपिसोडमध्ये होस्ट म्हणून पाहायला मिळेल. अशातच, 'सिनेमा मरते दम तक'ही सिरीज २० जानेवारी रोजी भारत तसेच जगभरातील २४० देश आणि प्रदेशांमध्ये प्राइम व्हिडिओवर प्रीमियर होण्यासाठी सज्ज आहे.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त